नागपूर : राज्यातही अनेक विजय माल्ल्या असल्याचं स्पष्ट झालंय. शासनाचा २९०० कोटींचा विक्रीकर बुडवून व्यापारी बेपत्ता झाल्याची माहिती अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीय.


थकबाकीदार व्यापारी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अनेक व्यापारी विक्रीकर बुडवून व्यवसायाचं ठिकाण सोडून बेपत्ता झालेत. थकबाकीदार व्यापाऱ्यांचा ठावठिकाणा लागत नसल्यामुळं विक्रीकराच्या वसुलीत अडथळे येत असल्याचं अर्थमंत्र्यांनी विधानसभेतल्या लेखी उत्तरात म्हटलंय. 


थकबाकीसाठी प्रयत्न


आयकर विभागाशी संपर्क करून प्रलंबित थकबाकी वसूल करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचं मुनगंटीवारांनी सांगितलंय. यासाठी पोलीस ठाणे, पोस्ट ऑफिस आणि कंपनी रजिस्ट्रार यांना शोध घेण्याचे निर्देश सरकारनं दिलेत.