मुंबई : आज मुंबईत येणार्या मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयक आणि कार्यकर्त्यांची पोलिसांनी काल रात्रीपासूनच धरपकड सुरू केलीयं. पुणे, नाशिक, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, ठाणे आणि मुंबईत पोलिसांनी समन्वयकांना स्थानबध्द केल्याची माहिती राज्यभरात पसरत आहे. आझाद मैदानावर शांततेच्या मार्गाने आंदोलन करण्यास मुंबई पोलिसांनी परवानगी दिलेली असतानाही राज्यभरातून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होणार नाहीत यासाठी पोलिसांचा ससेमिरा सुरू आहे.


पोलिसांची पाळत 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज पहाटे दादर मधून माऊली पवार, संजीव भोर व अंकूश कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं माटूंगा पोलीस स्टेशनला नेलंय. ठाण्याचे समन्वयक इंद्रजित निंबाळकर यांच्या घराबाहेरच पोलिसांनी पाळत ठेवली आहे. पोलीस स्टेशनला येण्यासाठी त्यांच्यावर दबाव टाकला जातोय. 


कोल्हापूरात दहा समन्वयकांना ताब्यात घेतल्याने 'कोल्हापूर बंद'ची हाक दिली आहे. तर नाशिक मधेही मराठा समाजात पोलीस कारवाईमुळे संतापाचे वातावरण आहे.


दरम्यान आझाद मैदाना पर्यंत पोहचलेल्या मराठा आंदोलकांनी 'ठिय्या' मांडला असून आंदोलन सुरू झाल्याची घोषणा केली आहे.