Maratha Community Protesters emotional : मनोज जरांगे मराठा आरक्षणाच्या मागणीवर ठाम आहेत. आज दिवसभरात 4 वेळा डॉक्टरांचं पथक त्यांची (Manoj Jarange Patil) तपासणी करण्यासाठी आलं. मात्र जरांगे यांनी तपासणी करण्यास नकार दिल्यानं 4 वेळा डॉक्टरांच्या पथकाला परत फिरावं लागलंय. त्यामुळे डॉक्टरांच्या पथकांची देखील चांगलीच फरफट होत असून डॉक्टरांनी विनवणी करून देखील जरांगे उपचारासाठी तयार नाहीत. तर दुसरीकडे त्यांनी पाणी पिण्यास (Drink Water) देखील नकार दिल्याने गावकऱ्यांचं देखील टेन्शन वाढलं होतं. त्यामुळे ग्रामस्थांनी जरांगे पाणी प्या, अशा घोषणा दिल्या. त्यावेळी आंदोलनस्थळी वातावरण भावूक झाल्याचं पहायला मिळालं होतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कातर आवाज अन् मनोज जरांगे यांचा हात थरथर कापत असल्याने नागरिकांना भावना (Maratha Community Protesters emotional) अनावर झाल्या. काही नागरिकांना अश्रू अनावर झाले. जरांगे पाटील यांनी किमान पाणी प्यावं असा आग्रह मराठा समाजाने केला. लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, असं लिहिलेली पोस्टर्स पहायला मिळत होते. तर ग्रामस्थांचा संताप वाढत चालल्याचं समोर येत आहे.


पाहा Video



जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं आहे. गावागावातील लोकांच्या चुली पेटत नाही. लोक जेवणही करत नाही. तुम्ही पाणी आणि उपचार घ्या असं संभाजीराजे चिठ्ठी लिहून म्हटलं आहे. त्यांनी संदेश दिला आहे. मी या गादीला कधीच नाही म्हटलं नाही. पण गादीनेही समाजाच्या कल्याणासाठी काम केलं आहे. मीही समाजाच्या कल्याणासाठी काम करतो. गादीने समाजाच्या कल्याणासाठी कधी माघार घेतली नाही. मीही कधी माघार घेणार नाही. मी गादीचा शब्द कधीच खाली पडू दिला नाही. पण माझा नाईलाज आहे. समाजाच्या कल्याणासाठी न्यायासाठी मला ही कठोर भूमिका घ्यावी लागते, असं जरांगे पाटील म्हणाले होते.


आणखी वाचा - इंदुरीकर महाराजांचा मनोज जरांगे यांना पाठिंबा, पुढील पाच दिवस सर्व कार्यक्रम रद्द


दरम्यान, गडाने मला माफ करावं. हे तुमचेच लेकरं आहे. तुमचेच भक्त आहेत. त्यामुळे गडाने मला माफ करावं. मी पाणी, उपचार नाही घेऊ शकत. माझ्या लेकराच्या वेदना सरकारने ओळखाव्या. तातडीने निर्णय घ्यावा. पुन्हा पुन्हा सांगतो मी गडाला कधीच नाही म्हटलो नाही, असं जरांगे पाटील म्हणाले. त्यानंतर ग्रामस्थानी हट्ट धरला अन् जरांगे पाटील यांनी घोटभर पाणी घेतलं. पण आंदोलन मागे घेणार नाही, असं म्हणत सरकारला इशारा दिला आहे.