मोठी बातमी! मनोज जरांगेंचे दोन शिलेदार ठरले, `या` मतदारसंघातून देणार उमेदवारी
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांना काही मतदारसंघांवर शिक्कामोर्तब केलं असून, उमेदवारांचाही निर्णय झाला आहे.
Manoj Jarange to Fight Maharashtra Assembly Election: मनोज जरांगे (Manoj Jarange) यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांना काही मतदारसंघांवर शिक्कामोर्तब केलं असून, उमेदवारांचाही निर्णय झाला आहे. जालन्यात मनोज पाटील यांची उमेदवारांसह बैठक सुरु आहे. यादरम्यान त्यांनी पुण्यातील दौंड आणि पर्वतीमध्ये उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे. या दोन्ही ठिकाणी मनोज जरांगे निवडणूक लढवणार असून आपले उमेदवार उभे करणार आहेत.
मनोज जरांगेंचा मोठा निर्णय! 'या' मतदारसंघांमधून निवडणूक लढणार; वाचा संपूर्ण यादी
मनोज जरांगे आज राज्यातील मतदार संघ आणि त्या मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करत आहेत. या अनुषंगाने जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये उमेदवारांची बैठक बोलावली आहे. ही बैठक काही वेळ थांबवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा या बैठकीला सुरुवात झाली आहे.
मनोज जरांगेंना कोण मॅनेज करतंय? लक्ष्मण हाकेंनी केला खुलासा, म्हणाले 'रात्रीच्या वेळी त्यांना...'
आतापर्यंत जरांगे यांनी बीड जिल्ह्यातील केज, जालना जिल्ह्यातील परतूर, नांदेड जिल्हयातील हदगाव, परभणी जिल्ह्यातील पाथरी, संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री मतदार संघात उमेदवार देण्याची घोषणा केली आहे. अजून इतर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात जरांगें उमेदवार देणार याचा निर्णय होणं बाकी आहे. दरम्यान जरांगे यांच्या बैठकीला सुरुवात झाली आहे. ही बैठक संपल्यानंतर जरांगे पत्रकार परिषद घेऊन मतदारसंघ आणि उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्याची शक्यता आहे.
बीड जिल्ह्यातील केज मतदारसंघातून आपण लढणार असल्याचं मनोज जरांगे यांनी जाहीर केलं आहे. आष्टी, गेवराई मतदारसंघातून लढायचं की नाही यावर चर्चा करून निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसंच मंठा परतूर मतदारसंघातून उमेदवार देत तेथूनही लढणार आहेत.
जालना जिल्ह्यातून केवळ एकाच मतदारसंघात मनोज जरांगे लढणार आहेत. परतूर -मंठा मतदारसंघातून उमेदवार देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. याशिवाय संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघातून लढणार असल्याचंही ते म्हणाले आहेत. ज्या मतदारसंघात उमेदवार नाही तिथे उमेदवार पाडणार, खुन्नस आहे तिथे पाडणार असंही ते म्हणाले आहेत.
काय निर्णय घेतला आहे?
संभाजीनगर-फुलंब्री मतदार संघातून लढणार
संभाजीनगर: कन्नड मतदार संघातून लढायचं की नाही यावर विचार करून निर्णय घेणार
संभाजीनगर:गंगापूर मतदार संघात उमेदवार पाडणार
संभाजीनगर: संभाजीनगर पश्चिम मतदार संघात पाठिंबा देणार
हिंगोली :कळमनुरी मतदार संघात उमेदवार पाडणार
हिंगोली:वसमत मतदार संघातून उमेदवार द्यायचा की नाही यावर विचार करणार
जालना: भोकरदन मतदार संघात उमेदवार पाडणार
जरांगेंचे उमेदवार तकलादू - लक्ष्मण हाके
"जरांगे पाटील जे उमेदवार देणार आहेत, तेथील उमेदवार त्यांना येऊन भेटलले आहेत. म्हणून त्या मतदारसंघांची नावं घेऊन मोकळे झाले आहेत. मला वाटतं तिथंदेखील उमेदवार मिळणार नाहीत. मिळाले तर एकदम तकलादू असतील. कोणाला तरी पाडण्यासाठी, कोणाला तरी निवडून आणण्यासाठी बारामतीच्या सांगण्यावरुन उमेदवार दिले असतील. त्यांच्या या उमेदवारांमध्ये काही ताकद नाही," अशी टीका लक्ष्मण हाके यांनी केली आहे.