Bharat Gogavale: आज मराठा समाजासाठी सर्वात मोठा दिवस आहे. ज्या मागण्यांसाठी समाज लाखोंच्या संख्येने रस्त्यावर उतरला. शांततापूर्वक आंदोलने केली. त्या आंदोलनाचे फलित आज मिळाले आहे. राज्य सरकारने मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी मान्य केली आहे. मुख्यमंत्र्यांनी विशेष अधिवेशन घेऊन यासंदर्भातील घोषणा केली आहे. यानंतर मराठा समाजामध्ये आनंद, जल्लोषाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाचे नेते भरत गोगावले यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दहा दहा हजाराच्या दोन फटाक्याच्या माळा लावा. आज असा जल्लोष करा की उद्धव साहेबांच्या कानठळ्या बसल्या पाहिजेत, असे आवाहन त्यांनी मराठा समाज बांधवांना केले आहे.


मराठा आरक्षणावरून जल्लोष करत असताना भरत गोगावलेंनी हे विधान केले आहे. त्यांनी आपल्या  पदाधिकाऱ्यांना विधिमंडळ परिसरातून सूचना दिल्या आहेत. त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


नेमकं काय झालं?



मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यानंतर सभागृहाबाहेर भरत गोगावले हे मोबाईलवरुन पदाधिकाऱ्यांशी फोनवर बोलताना दिसत आहेत. 
ऐकना, दहा दहा हजाराच्या दोन दोन माळा वाजवा. त्या उद्धव साहेबांच्या कानठाळ्या बसल्या पाहिजेत. आणि हे बघ सर्व मराठ्यांना बोलवं..खरे मराठे असाल तर तिथे जमालं. मराठे नसाल तर तिथे येणार नाही. मग ठीक आहे. तुम्ही सर्वांना बोलवा. सर्व नगरसेवक, विभागप्रमुख सर्व आले पाहिजेत. फोटो इथे यायला पाहिजेत. साहेबांना दाखवायला,असे ते म्हणाले. 


'आजचा दिवस ऐतिहासिक, मराठा समाजाला दिलेल्या आश्वसनांची पूर्तता केली' मुख्यमंत्री शिंदे


महाड भागात सर्वांना बोलवा आणि जल्लोष करा. खरे मराठी असाल तर जल्लोष मोठ्या प्रमाणात करा. सर्वांना फोन करून बोलवा, असे आवाहन गोगावलेंनी केले आहे.  भरत गोगावले यांच्या पदाधिकाऱ्यांना फोनवरून सूचना दिल्या आहेत.


प्रस्ताव सभागृहात मंजूर 


मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात 10 टक्के आरक्षणाचा प्रस्ताव सभागृहात मंजूर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सभागृहात आरक्षण विधेयक मांडलं. याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली. यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपलं  म्हणणं मांडलं. आजचा दिवस कर्तव्याची जाणीव करुन देणार आहे. मराठा बांधवांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगतिलं. मनोज जरांगे यांच्या एकजुटीचा विजय असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय.