Maratha Reservation GR: मराठा आरक्षणाच्या जीआरबाबत लवकर निर्णय घ्या,नाहीतर पाण्याचाही त्याग करीन असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला आहे.एक ओळीचा का होईना मराठा आरक्षणाबाबत तातडीने जीआर काढा नाहीतर सरकारच्या सांगण्यावरून मी जे पाणी पितो आहे त्या पाण्याचाही त्याग करीन असा ईशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलाय. दुसरीकडे मराठा आरक्षणाचा जीआर एका दिवसात GR काढणं शक्य नाही, यासाठी आणखी कालावधी लागणार असल्याची माहिती समोर आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गिरीश महाजन, अतुल सावेंचं शिष्टमंडळ  जरांगेंशी पुन्हा चर्चा करणार आहे. शिष्टमंडळाआधी अर्जुन खोतकर, नारायण कुचेदेखील चर्चा करl आहेत. जरांगेंच्या मनधरणीसाठी सरकारचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. आरक्षणासंदर्भात जीआर काढण्यासाठी जरांगे पाटलांनी 30 दिवसांचा वेळ द्यावा अशी मागणी अर्जुन खोतकरांनी केली आहेत. तर जीआर काढल्याशिवाय माघार नाही, या भूमिकेवर जरांगे पाटील ठाम आहेत.


मराठा समाजाला आरक्षण देण्याचा जीआर काढण्याबाबत राज्य सरकार  जरांगे पाटील यांच्याकडे 30 दिवसांचा वेळ मागितलाय. सरकारकडून एका दिवसांत जीआर काढणं शक्य नाही, त्यामुळे राज्य सरकारच्या  शिष्टमंडळानं 30 दिवसांचा वेळ मागितलाय. सरकारच्या वतीनं अर्जुन खोतकरांनी जरांगेपाटलांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी सरकारकडून 30 दिवसांची मुदत मागितलीय. आता जरांगे पाटील यावर काय निर्णय घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.


हे सरकार धाडसी आहे.जे निर्णय होत नव्हते.ते निर्णय या सरकारने घेऊन दाखवले आहे त्यामुळे जीआरची याच सरकारकडून अपेक्षा आहे असंही जरांगे पाटलांनी म्हटलं आहे.पण जीआर घेतल्याशिवाय माघार नाही असंही ते म्हणाले.


दोन समाजात भांडणं लावायचं काम- वडेट्टीवार


दुसरीकडे सरकारकडून दोन समाजात भांडणं लावायचं काम सुरु आहे, मराठा-ओबीसीत भांडणं लावायचं काम करु नये असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी केलाय.. ओबीसी आरक्षण वाढवून द्या आणि त्यात मराठा समाजाचा समावेश करा अशी आपली भूमिका आहे. याबाबत भुजबळांशीही बोलणं झालंय, असंही विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय.


सरकारने  गुडघे टेकलेत- राऊत 


सरकारने आंदोलकांसमोर गुडघे टेकलेत अशी टीका संजय राऊत यांनी केली. सरकारच्या पन्नास खोक्यांनी जरांगे पाटील किंवा मराठा आंदोलक विकले जाणार नाहीत असं राऊत म्हणाले.