Maratha Reservation: महाराष्ट्र सरकारकडून मराठा आरक्षणासंदर्भात वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण नाही दिल तर पुढं काय? असा प्रश्न विचारला जात आहे. यावर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी छगन भुजबळ यांच्यावर टीका केली आहे. तसेच त्यांनी ओबीसी आरक्षणावरही भाष्य केले. सगळ्यांनी प्रत्यक्ष यावे पुढील आंदोलन आपल्याला ठरवायचं आहे. ओबीसी बैठक घेत असेल तर घ्यावे आमचं भांडण त्यांच्यासोबत नाही सरकार सोबत आहे. आमचा त्या आरक्षणाला विरोध नाही पण ते टिकेल का? हा प्रश्न आहे. मराठ्यांनी ते आरक्षण स्वीकारले होते मात्र कोर्टाने नंतर ते फेटाळले, याही वेळी कोर्टात गेले तर, आम्हाला खात्री नाही, असे जरांगे म्हणाले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्हाला कायम स्वरूपी आरक्षण हवंय, 50 टक्क्यांच्या आत ते आरक्षण होईल का? जर ते टिकेल तर तो मराठ्यांचा विजय आहे. आंदोलनाचा विजय आहे.. पण टिकणार नसेल तर ओबीसी आरक्षण योग्य राहील आम्हाला इकडेच आरक्षण हवे आहे. तिकडे का देताय कळत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणवर ठाम असल्याची भूमिका मनोज जरांगे यांनी मांडली. 


आमच्या आंदोलनामुळे पेटीशन केलीय, टास्क फोर्स निर्माण केलाय पण सरकार हे का करतंय? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आम्हाला ओबीसी आरक्षण द्या इतकंच आमचं म्हणणं आहे. ते आरक्षण कसं टिकेल सांगा, आम्ही तयार आहे मात्र ते टिकणार नाही, त्यापेक्षा ओबीसी नोंदी सापडत आहे तेच करा मराठे ओबीसीमध्ये समावेश करा, असे जरांगे म्हणाले. 


उपोषण सोडताना 6 मंत्री आले. आरक्षणचे काय होणार हे त्यांनी 17 तारखेपर्यंत सांगावे नाहीतर आंदोलना अटळ, कारण उपोषण सोडल्यानंतर एकही मंत्री बोलला नाही. आम्हाला फसवलं की काय असा प्रश्न आम्हाला पडलाय. एकदा 17 ला आम्ही निर्णय घेतला की तुमचा आमचा विषय संपला, असे ते म्हणाले. 


जे ठरलं होतं ते कागद सगळ्या मंत्र्यांकडे आहेत. मात्र आम्हाला अजून लेखी दिले नाही. आम्ही व्हीडिओ फोटो घेऊन ठेवले आहेत. आमचा सरकारवर अजूनही विश्वास आहे. सरकार आमचं भलं करेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


यावेळी त्यांनी भाजप नेते नितेश राणे यांच्यावरही भाष्य केले. देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही, असे राणे म्हणाले होते. याला जरांगेंनी प्रत्युत्तर दिलंय. त्यांच्यावर काय बोलायचं? त्यांचं सगळं मराठ्यांना कळलं आहे. त्यांना सोडलंय त्यांची मजबुरी आहे. पक्ष आणि फडणवीस त्यांना बोलायला लावतात आहेत. मात्र कोण वाटोळं करते ते मराठ्यांना सगळं कळतंय असे ते म्हणाले. 


तसेच त्यांनी भुजबळांवरही यावेळी टीका केली. फडणवीस साहेब त्यांना साथ देत आहेत. अजित पवार त्यांना साथ देत आहेत. म्हणून मराठ्यांवर अन्याय होतोय आणि समाजात त्यांच्या बाबत रोष निर्माण होतोय. त्यांना संरक्षण, त्यांना सवलती, ते जे म्हणतील ते सगळं देत आहेत आणि आमचं वाटोळं करत आहेत , असे जरांगे म्हणाले.