Maratha Reservation: कोट्यवधी मराठे पुन्हा एकदा एकवटणार आहेत. 900 एकर जागेवर मराठा समाजाची विराट सभा होईल अशी घोषणा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. कुणबी आरक्षण आणि सगेसोयरे शब्दाच्या अंमलबजावणीसाठी ही विराट सभा घेणार असल्याचं जरांगेंनी जाहीर केलंय. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिका केलीय. काय म्हणाले जरांगे? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

6 कोटी मराठा शांततेत एकत्र येणार आहे. सभेची तारीख आणि ठिकाण अजून ठरलेलं नाही.. मात्र लोकसभा निवडणुकीच्या आधी ही विराट सभा होईल, असे जरांगे पाटलांनी म्हटले आहे. 


मनोज जरांगेंच्या घोषणनेतर विराट सभेसाठी मैदानाची पाहणी सुरु झालीय.  फडणवीसांची दपशाही, दहशत आणि गुंडगिरी ही सत्तेच्या जोरावर चालली आहे. मैदान भेटल्यावर मी पुढची सर्व माहिती देणार असल्याचे ते म्हणाले.  


आम्हाला शांत एकत्र येऊन यांचं सगळ बिघडवाव लागणार आहे. आम्ही 700 एकर जागा पाहिली पण ती आम्हाला कमी पडते. 6 कोटी मराठे एकत्र येणार आहेत. आम्हाला शांततेत एकत्र यावं लागणार आहे. याचं सगळ बिघडवाव लागणार असल्याचे जरांगे यावेळी म्हणाले.


जरांगे लोकसभा लढवणार?


मराठा नेते मनोज जरांगे पाटील लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भोकरदन तालुक्यातील आव्हाना येथील सभेत तसे संकेत देण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत आता मराठा समाजाचे अनेक कार्यकर्ते उमेदवारीसाठी अर्ज करण्याची शक्यता आहे. 


काय म्हणाले जरांगे?


मराठ्यांचा लढा राजकारण म्हणून बघू नये. आता मराठा एकत्र आला आहे. एकजूट फुटू द्यायची नाही. सगेसोयऱ्यांबाबत सरकारची काही दिवस वाट बघू. मराठ्यांना आरक्षणाची गरज नाही, असं फडणवीसांना वाटतंय. आपण दिलेल्या 10 टक्के आरक्षणामुळे मराठा खुश आहे, असं त्यांना वाटतंय. मराठ्यांनी ओबीसीतून आरक्षण मागितले पण तुम्ही 10 टक्के दिलं. यामुळे मराठ्यांनी गुलाल उधळला नाही. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी केली असती तर तुमच्या अंगावरचा गुलाल 15 दिवस निघाला नसता, असे जरांगे म्हणाले.


जरांगेंना सरकारी सुरक्षा 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सरकारला वेठीस धरणारे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना आता सरकारी सुरक्षा मिळणार आहे. राज्याच्या गृह विभागाकडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मनोज जरांगे पाटलांच्या अवती भोवती 24 तास पोलीस असणार  आहेत. 2 सशस्त्र पोलीस कॉन्स्टेबल त्यांच्यासोबत असतील अशी माहिती देण्यात आली आहे. मनोज जरांगेंना सुरक्षा पुरवावी अशी मागणी मराठा समाजाकडून करण्यात आली होती. राज्य गुप्तवार्ता विभागाच्या आदेशानंतर जरांगे पोलीस सुरक्षा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.