Maratha Reservation: फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय, मनोज जरांगेंचे गंभीर आरोप
Maratha Reservation: सरकारनं भुजबळांना माझ्या विरोधात उभं केल्याचं सांगत फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोपही जरांगेंनी केलाय.
Maratha Reservation: ओबीसी नेते मराठा आरक्षणाला विरोधच करणार असं वक्तव्य जरांगेंनी केलंय. भुजबळांचं ऐकून मराठ्यांवर अन्याय करु नका असंही जरांगे म्हणालेत. सरकारनं भुजबळांना माझ्या विरोधात उभं केल्याचं सांगत फडणवीसांनीच भुजबळांना बळ दिलंय असा आरोपही जरांगेंनी केलाय.
धाराशिव मराठा आरक्षणाच्या जनजागृतीसाठी मनोज जरांगे पाटील यांची आज धाराशिव मध्ये शांतता रॅली आहे .धाराशिव शहरातील अहिल्याबाई होळकर चौकातून सकाळी 11 वाजता या जनजागृती रॅली ला सुरुवात झाली आहे. शहरभर फिरून या रॅली ची दुपारी छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होणार आहे. यानंतर मनोज जरांगे पाटील यांची सभा होणार आहे .आज होणाऱ्या या शांतता रॅलीचे मोठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मनोज जरांगे पाटील आज या सभेतून कोणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
फडणवीस यांनीच भुजबळांना बळ दिलंय
आम्ही उभे राहू किंवा पाडू. फडणवीस यांनीच भुजबळांना बळ दिलंय, असे ते म्हणाले. आम्ही शांततेत काम करतो. तो माणसांना आंदोलनं करायला लावतो, अशी टीका जरांगेंनी भुजबळ आणि फडणवीसांवर केलीय.
भुजबळांचं स्वप्न हे राज्य पेटवत ठेवण्याचं
सत्ताधारी विरोधक यांना गांभीर्य नाही. त्यांना कधीही गरीबांशी देणं घेणं नाही. महाराष्ट्र पेटता राहणार नाही. महायुती आणि महाविकास आघाडीचं जरी हे स्वप्न असलं तरी भुजबळांचं स्वप्न हे राज्य पेटवत ठेवण्याचं आहे. छगन भुजबळांना माझ्या विरोधात सरकारने उभं केलंय, असेही ते म्हणाले.