विष्णू बुर्गे, झी मीडिया बीड :  मराठा समाजाच्या आरक्षणाला सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे विवेक रहाडे याने आपल्या सुसाईट नोटमध्ये लिहिल्याचा दावा नातेवाईकांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी ही सुसाईड नोट हस्ताक्षर एक्सपर्टकडे पाठवली होती. हस्ताक्षर एक्सपर्टचा अहवाल आता आला असून ही नोट बनावट असल्याचे स्पष्ट करण्यात आलंय. बीड पोलीस अधीक्षक रामा राजा स्वामी यांनी प्रसार माध्यमाना यासंदर्भात माहिती दिली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी हे पत्र ट्वीट करत महाराष्ट्र सरकारला सहाय्य करण्याचे आवाहन केले होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विवेक रहाडेच्या आत्महत्येला सरकार वेगळं वळण देत आहे. उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पीडित कुटुंबावर सरकार दडपशाही करत असेल तर कदापिही मराठा समाज सहन करणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे यांनी म्हटले राज्य सरकार विषयाला डायव्हर्ड करत असेल तर सरकारला मराठा समाजाच्या तीव्र रोशला समोर जावं लागेल असा धमकी वजा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या समन्वयकांनी दिला. आज आमच्या तरुण युवकांनी बलिदान दिले. त्या बलिदाच्या विषयाला डायव्हर्ड करत असाल तर कदापिही मराठा समाज खपून घेणार नाही सरकारला महागात पडेल असेही ते म्हणाले. 



विवेक राहाडेची कथित सुसाईट नोट नकली असल्याचे पोलिसांनी म्हटलंय. तर विवेक रहाडे आत्महत्या प्रकरणात उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर महाराष्ट्र पोलीस दडपशाही करत असून ते खपवून घेतलं जाणार नसल्याचा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाने इशारा दिला आहे.



पोलिसांनी तपासात केलेल्या दाव्यानंतर आता मराठा समाज पुन्हा एकदा आक्रमक झालाय आणि पोलीस प्रशासन आणि मराठा समन्वयक असा नवा वाद समोर येण्याची शक्यता आहे. दरम्यान विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आज या पीडित कुटुंबाची भेट घेणार आहेत.