मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठीच्या मतदानासाठी अवघ्या काही दिवसांचा अवधी शिल्लक आहे. जनतेने मतदान करावे यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. पंरतू काही नागरिक मतदान करत नाही. जास्तीत जास्त प्रमाणात मतदान व्हावे, तसेच मतदानाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मराठी कलाकार आव्हान करणार आहेत. यासाठी मराठी कलाकारांनी मोहिम हाती घेतली आहे. या मोहिमेला आयव्होट नाव देण्यात आले आहे. विशेष म्हणजे ही मोहिम दारोदार न जाता सोशल मीडिया द्वारे राबवण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या मोहिमेचे व्यवस्थापन वाईड विंग्ज मीडिया तर्फे केले गेले आहे. सध्या सोशल मीडियाचे मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. त्यामुळे मतदारांसमोर जाण्यासाठी सोशल मीडिया हे उत्तम माध्यम आहे. आपल्या देशातील तरुण तसेच नवमतदारांची संख्या जास्त आहे. आणि ही तरुणाई सोशल मीडियावर सक्रिय असते. त्यामुळे आयव्होट या मोहिमेद्वारे सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहचणे सोपे पडणार आहे. कलाकारांनी हाती घेतलेली आयव्होट ही मोहिम संवाद पद्धतीने पार पाडली जाणार आहे. यानुसार मतदारांना नवनवीन माहिती देण्यात येणार आहे. मतदारांनी आपले कर्तव्य पार पा़डून लोकशाही बळकटीकरणास हातभार लागावा हाच उद्देश या मोहिमेचा आहे.


जास्तीत जास्त कलाकारांचा समावेश


मतदारांना आपले कर्तव्य पार पाडावे यासाठी चित्रपट, मालिका, नाटक तसेच आदी क्षेत्रातील कलाकार आपला सहभाग घेणार आहेत. सहभाग घेणाऱ्या कलाकारांच्या यादीमध्ये सुबोध भावे, वैभव तत्त्वववादी, गश्मीर महाजनी, स्पृहा जोशी, दीप्ती देवी आणि अक्षय वाघमारे यांचा समावेश आहे. 


महाराष्ट्रात लोकसभा निवडणूक एकूण ४ टप्प्यात पार पडेल. महाराष्ट्रातील एकूण ४८ लोकसभा मतदार संघासाठी पहिल्या टप्प्यातील मतदान हे सात मतदार संघासाठी ११ एप्रिलला होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील एकूण १० मतदारसंघासाठीचे मतदान १८ एप्रिलला होणार आहे. तिसऱ्या टप्प्यातील मतदान हे २३ एप्रिलला होणार असून या टप्प्यात १४ मतदारसंघासाठी मतदान घेतले जाणार आहे. तर अखेरच्या आणि चौथ्या टप्प्यात १७ मतदारसंघासाठी  २९ एप्रिलला मतदान प्रक्रिया पार पडेल.