मी शरद पवार यांना वाकून नमस्कार करेन; राज ठाकरे यांचे जाहीर वक्तव्य
पिंपरी चिंडवडमध्ये 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी मराठी कलाकारांना अतिशय महत्वाचा सल्ला दिला आहे. यावेळी राज ठाकरे यांनी शरद पवार यांचे उदाहरण दिले.
Maharashtra Politics: मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकारांचे वागण्यात नेमकी या चुक होते. त्यांनी आपल्या वागण्यात कशा प्रकारचा बदल केला पाहिजे हे राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी राजकीय उदाहरण देऊनच पटवून दिले आहे. शरद पवार (Sharad Pawar) मला भटले तर मी त्यांना वाकून नमस्कार करेन असे राज ठाकरे म्हणाले.
पिंपरी चिंडवडमध्ये 100 वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात राज ठाकरे यांनी जाहीर मुलाखतीत मराठी कलाकारांच्या वागण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मराठी कलाकार एकमेकांना मान सन्मा देत नाहीत. मराठी कलाकारांचे वर्तन कशा प्रकारचे असावे याबाबत काही सल्ले दिले आहे.
अंड्या, पचक्या, आद्या, पाद्या... अशा प्रकारे मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने हाका मारतात. जाहीर कार्यक्रमात स्टेजवर प्रेक्षकांसमोर मराठी कलाकार एकमेकांना एकेरी नावाने बोलवतात. तुमची मैत्री चार भिंतीत असली पाहिजे. चार चौघात कलाकारांनी एकमेकांन मान दिलाच पाहिजे असा सल्ला राज ठाकरे यांनी दिला.
हे पटवून देताना राज ठाकरे यांनी साऊथ च्या कलाकारांचा संदर्भ दिला. साऊथचे कलाकर रात्री एकत्र बसून दारु पित असले तरी सार्वजनिक कार्यक्रमात भेटल्यावर एकमेकांना मान देऊनच बोलतात. मराठी कलाकारांनी लोकांसमोर एकमेकांसमोर मान दिला पाहिजे. नाही तर कुणीही तुम्हाला मान देणार नाही. चार चौघांमध्ये एकमेकांना मान देऊनच बोलल पाहिजे.
कलाकार नाक्यावर उभे राहिले तर त्यांना कुणीही पहायला येत नाही. लोकांनी तुम्हाला पैसे देऊन पहायला यावे असे वाटत असेल तर मान हा दिलाच पाहिजे. अशोक सराफ हे मराठी मधील खूप दिग्गज कलाकार आहेत. मात्र, कार्यकर्मांमध्ये अशोक सराफ यांच्या बद्दल चौकशी करताना मराठी कलाकार मामा आलेत का? असा प्रश्न विचारतात. मात्र, मामा न म्हणता अशोक सर असं आदराने बोलले पाहिजे. एकमेकांना मान देऊनच बोलले पाहिजे तरच नाट्य क्षेत्राचे भविष्य आहे.
सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये एकमेकांच्या खांद्यावर हात टाकून एकेरी भाषेत बोलणे मराठी कलाकारांनी टाळले पाहिजे असे राज ठाकरे म्हणाले. राजकीय भाषेत सांगायचे झाले तर या स्टेज वर जर शरद पवार आले तर मी त्यांना पाया पडेल, राजकीय भूमिका स्टेज वर....! तुम्ही एकमेकांचा आदर राखला पाहिजे...! असं राज ठाकरे म्हणाले.