मराठी विद्यापीठ : मुख्यमंत्री फडणवीस यांचा निषेध, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यवतमाळ : ऋद्धपूर येथे मराठी विद्यापीठाची स्थापना करण्याबाबतची भूमिका बदलल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा निषेध करत यवतमाळ जिल्ह्यातील महानुभाव पंथीय अनुयायांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
श्रीक्षेत्र ऋद्धापूर हे मराठी साहित्याचे उगमस्थान असून ऋद्धापूर येथेच मराठी विद्यापीठाची स्थापना करण्यात यावी आशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
याआधी मुख्यमंत्र्यांनीच मराठी विद्यापीठ याठिकाणी करण्यासाठी भूमिका घेतली होती. मात्र आता मुंबई येथे मराठी विद्यापीठाच करण्याचा निर्णय जाहीर केल्यामुळे मराठी भाषीय आणि महानुभाव पंथियांचा अपमान झाला, अशी भावना अनुयायांनी निवेदनातून व्यक्त केली आहे.