सांगली : शिवप्रतिष्ठानच्या वतीनं संभाजी भिडे गुरुजी सन्मान महामोर्चा काढला जाणार आहे. सांगलीत पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती देण्यात आलीय. 28 मार्चला राज्यात जिल्हा स्तरावर हे भव्य मोर्चे काढले जाणारयत. फक्त राज्यातच नाही तर बेळगाव आणि गोव्यातही मोर्चे काढले जाणार आहेत. या मोर्च्याला विविध पक्ष आणि दलितांच्या 24 संघटनाचा पाठिंबा आहे. प्रकाश आंबेडकरांवर कारवाईची मागणी करण्यात आलीय.  


सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा इशारा


अन्यथा सरकार विरोधात कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे. शिवप्रतिष्ठानचे कार्यवाह नितीन चौगुले यांनी ही माहिती दिली आहे. शिवाय भिडे गुरुजींवरचे गुन्हे मागे घ्या, पुण्यातल्या एल्गार परिषदेतल्या वक्तव्यांवर गुन्हे दाखल करा. तीन जानेवारीला झालेल्या नुकसानीची भरपाई, बंद पुकारणाऱ्यांकडून वसूल करावी, या आणि आणखीही काही मागण्यांसाठी हा महामोर्चा काढला जाणार आहे.