माथेरान: सेल्फीच्या नादात भान हरवू नका, असं अनेकवेळा सांगूनही त्यातून धडा घेतला जात नाही... गेल्या काही महिन्यांत अशा घटना वारंवार घडल्यायत... आता माथेरानमध्ये सेल्फीच्या नादात एक महिला पर्यटकांनं जीव गमावलाय.  खोल दरीत पडून सरिता चौहान या ३५ वर्षीय महिलेचा मृत्यू झालाय. दिल्लीतून खास माथेरानला फिरण्यासाठी चौहान दाम्पत्य आलं होतं. लुईजा पॉईंटला सुरक्षा कठडा असूनही हे चौहान दाम्पत्य काठड्या बाहेर सेल्फी काढत होतं.  त्यांचा कठड्याबाहेरचा सेल्फी देखील उपलब्ध झालाय. वाऱ्याच्या झोका असताना सरिता आणि राममहेश दोघे सेल्फी काढत होते. वाऱ्याच्या वेगामुळे सरिताचा तोल गेला आणि लुईजा पॉइंटच्या  600 फूट खोल दरीत कोसळली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.


जिवघेण्या सेल्फीत मृत्यू


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या जिवघेण्या सेल्फीत महिलेचा मृत्यू झाल्यावर तिचा मृतदेह शोधण्याचे काम सुरू झाले आहे. सह्याद्री रेस्क्यू टीम घटनास्थळी पोहोचली असून, शोधकार्य सुरू झाले आहे.


पर्यटनासाठी दाम्पत्य दिल्लीहून माथेरानला


मंगळवारी माथेरान येथील लुईसा पॉईंट वर संध्याकाळी ६ वाजता ही घटना घडली. चौहान परिवार दक्षिण जुनी दिल्ली येथून खास माथेरान फिरावयास आला होता. एक मुलगी आणि मुलगा व मेहुणी आणि हे दोघे असा ५ जणांचा परिवार माथेरान फिरावयास आला होता. माथेरानच्या लुईजा पॉईंटला सुरक्षा कठडा आहे. मात्र, चौहान दाम्पत्य काठड्या बाहेर सेल्फी काढत होते असल्याचा त्यांचा सेल्फी देखील उपलब्ध झाला आहे. पावसाळी वातावरण असल्याने कड्या किनारी वारे वाहत असतात. वाऱ्याच्या झोकात सरिता आणि राममहेश दोघे सेल्फी काढत असताना सरिता या लुईजा पॉइंटच्या ६०० फूट खोल दरीत कोसळल्या.