वऱ्हाड निघालं हेलिकॉप्टरनं, शाही थाटात नवरदेवाची वरात
मावळ मधल्या ढोणे गावातल्या एका नवरदेवाने त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला.
कैलास पुरी, पिंपरी चिंचवड : लग्नामध्ये नवरदेव हौसे साठी काय करेल हे सांगता येत नाही. मावळ मधल्या ढोणे गावातल्या एका नवरदेवाने त्याचं वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टरमध्ये बसवून घेऊन गेला. मावळ गावचा शेतकरी असलेल्या अशोक वाडेकर ही अनोखी शक्कल लढवली आहे. त्याच लग्न नुकतंच पार पडलं. पण त्याच्या लग्नाची मावळात चांगलीच चर्चा आहे कारण त्याने त्याच वऱ्हाड चक्क हेलिकॉप्टर मधून आणलं
घोटावडे मुळशी मधल्या काळूराम देवकर यांची मुलगी पुजा हिच्याशी होणाऱ्या लग्नासाठी वाडेकर कुटूंबियांनी पुणे येथील एका कंपनीचे हेलिकॉप्टर ७५ हजार रूपये प्रतितास दराने भाडेतत्वार घेतले. हेलीकॉप्टर सकाळी दहा वाजता मावळ तालुक्यातील छोट्याशा डोने गावात पोहोचले हेलिकॉप्टरला पाहण्यासाठी गावातील नागरिकांनी एकच गर्दी केली, काही तर आपल्या घराच्या छतावरील थांबले होते.
अकरा वाजण्याच्या सुमारास डोणे गावातून वाजत गाजत शाही थाटात नवरदेवाची वरात काढण्यात आली. अवघ्या मिनिटांतच नवरदेव नातेवाईकांसह हॅलिकॉप्टरमध्ये बसून नवरी आणण्यासाठी आकाशात उडाला. छोट्याशा खेडेगावात रंगलेल्या या शाही विवाह सोहळ्याची तालुक्यात दिवसभर चर्चा रंगली होती.वडिलांची इच्छा असल्यामुळे हेलिकॉप्टर मधून वऱ्हाड घेऊन गेल्याचे कुटुंबीय सांगतात.