नागपूर : विदर्भात ऐन हिवाळ्यात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. १३ आणि १४ डिसेंबरला विदर्भात काही ठिकाणी मध्यम, हलक्या स्वरुपाचा पावसाचा अंदाज आहे. नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने हा अंदाज वर्तवला आहे. त्याचवेळी गारपीट होण्याची शक्यता आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पूर्व विदर्भात हा पाऊस पडण्याची शक्यता जिल्हा आपत्ती व्यवस्थापक विभागाने वर्तविली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कापलेले धान संभाळून ठेवावेत. सुरक्षित ठिकाणी ठेवावे. हवामानत बदल झाल्याने थंडीतही वाढ होण्याची शक्यता आहे. आजार बळवण्याची शक्यता आहे. रुग्णांची आणि आपल्या मुलांची तसेच पाल्यांची पालकांनी काळजी घ्यावी. पाऊस पडण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घ्यावी, असे आवाहन भंडारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापक अधिकारी अभिषेक नामदास यांनी केले आहे.


दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी अवेळी पाऊस झाला होता. त्यावेळी मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. मध्य-महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातही पावसाचा मोठा फटका बसला. मध्य, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे हाती आलेले पिक वाया गेले. अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले. ओल्या दुष्काळाचे संकट उभे राहिले.