#MeToo नं `सिम्बायसीस` हादरलं, प्राध्यापकांवर आरोप
`सिम्बायसिस`मधील आजी माजी १० विद्यार्थिनींच्या सोशल मीडियावर तक्रारी
पुणे : लैंगिक शोषणाविरोधात आवाज उठवणाऱ्या #MeToo या चळवळीचं लोण आता महाविद्यालयांपर्यंत पोहोचलंय. पुण्यातील 'सिम्बायसीस सेंटर फॉर मीडिया अॅन्ड कम्युनिकेशन' मधूनही लैंगिक शोषणाचे प्रकार पुढे आलाय. याबाबत महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर वाचा फोडली़य. 'सिम्बायसिस'मधील आजी माजी १० विद्यार्थिनींनी सोशल मीडियावर तक्रारी मांडल्या असून काही विद्यार्थिनींनी प्राध़्यापकांवरही आरोप केलाय.
समाज माध्यमांवर होत असलेल्या तक्रारींची दखल घेत एससीएमसी प्रशासनाने फेसबूक पेजवर दिलगिरी व्यक्त करणारं पत्र लिहून माफी मागितलीय. तसेच याबाबत पुढे येऊन स्थापन केलेल्या समितीकडे तक्रार देण्याचंही आवाहन केलंय.
तक्रारींनंतर प्रशासनानं एक निवेदन सोशल मीडियावर जाहीर केलंय. 'महाविद्यालयाचं कॅम्पस लैंगिक शोषणमुक्त राहावं, यासाठी आम्ही विद्यार्थ्यांशी अधिक संवाद साधत आहोत' असं त्यात म्हटलं गेलंय.