Shocking News: शेवटी जे घडायचं ते घडतंच! डॉक्टर जवळ असूनही जीव वाचला नाही
Shocking News : माणसाला मृत्यू कधी आणि कुठे गाठेल याचा नेम नाही. डॉक्टर जवळ असून काहीच करु शकले नाहीत. एका क्षणात मृत्यूने गाठले. बसल्या जागीच मृत्यू झाला.
सतीश मोहिते, झी मीडिया, नांदेड : बऱ्याचदा अशा घटना घडतात की आपल्या हाती काहीच नसते. शेवटी जे घडायचं ते घडतचं. असाच एक धक्कादायक प्रकार नांदेडमध्ये (Nanded) घडला. डॉक्टर जवळ असूनही मेडिकल चालकाचा जीव वाचला नाही. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मेडिकल चालकाचा मृत्यू झाला आहे. रुग्णालय वरच असताना या व्यक्तीता जीव वाचू शकला नाही (Shocking News).
हृदयविकाराचा झटका किती जीवघेणा असतो याचा प्रत्यय देणारी अशीच ही घटना म्हणावी लागले. हा सर्व प्रकार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. एका खाजगी रुग्णालयातील मेडिकल चालकाचा -हुदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाला. हा अटॅक इतका तीव्र होता की मेडिकलच्या वरच्या मजल्यावर असताना याचा जीव वाचू शकला नाही. हुदयविकाराचा झटका आल्यानंतर तात्काळ या व्यक्तीला अतिदक्षता विभागात नेण्यात आले. पण, डॉक्टर त्याचे प्राण वाचवू शकले नाहीत.
नांदेड शहरात ही शॉकिंग घटना घडली आहे. हा सर्व थरार सीसीटिव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. नांदेड शहरातील डॉक्टर लेन मध्ये गुरुकृपा हॉस्पिटल मध्ये पवन तापडिया यांचे औषधी दुकान आहे. काल रात्री 9 च्या सुमारास पवन तापडिया आपल्या औषधी दुकानात बसले होते. खुर्चीवर बसून कॉम्पुटर वर ते काही काम करत होते. त्यांच्या शेजारी त्यांचा सहकारी बसला होता. अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि ते खुर्चीवरून झाली पडले.
मेडिकलच्या वरच्या मजल्यावच रुग्णालयाचा अतिदक्षता विभाग असल्याने त्यांना तात्काळ हलवण्यात आले. डॉक्टरांनी पावन तापडिया यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. पण हार्ट फेल झाल्याने तापडिया यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. अगदी रुग्णलायातच हृदयविकारा झटका आला, डॉक्टर, सर्व मेडिकल सुविधा असतानाही तापडिया यांचे प्राण वाचले नाहीत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
परिक्षेची भिती, हृदयविकाराच्या झटक्यानं दहावीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू
मुंबईत दहावीच्या पहिल्या पेपरआधीच एका विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्यानं झोपेतच मृत्यू झाला. प्रभादेवीच्या आदर्शनगरमध्ये राहणारा ऋतिक घडशीचं काल रात्री दीडच्या सुमारास निधन झालं. दादरच्या शिशूविहार शाळेत तो दहावीच्या वर्गात होता. पहिल्या पेपर च्या आधल्या रात्रीच त्याला हृदयविकाराचा इतका जोरात झटका आला की केईएम रुग्णालयापर्यंतही पोहचता आलं नाही. रुग्णालयात दाखल होण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. ऋतिकच्या घरी आई आणि दोन बहिणी आहेत. आई धुणी भांडी करून घर चालवते. अवघ्या सोळाव्या वर्षी हृदयविकारानं ऋतिकचा मृत्यू झाल्यानं, परीक्षेच्या तणावाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.