Meera Borwankar on Ajit Pawar:  पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त मीरा बोरवणकरांनी पालकमंत्री अजित पवारांवर थेट निशाणा साधला आहे. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांचे नाव घेत मीरा बोरवणकर यांचा अजित पवार यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत. मीरा बोरवणकर यांच्या आरोपांमुळे पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.मीरा बोरवणकर यांनी  'मॅडम कमिशनर' या पुस्तकात अनेक मुद्दे मांडले आहेत.


अजितदादांनी  पोलिसांची जागा  बिल्डरला द्यायला सांगितली


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

येरवडा इथली पोलिसांची जागा शाहिद बलवा बिल्डरला द्यायला अजितदादांनी सांगितली. मात्र आपण त्यास विरोध केला, असा दावा बोरवणकरांनी आज केला.. तुम्ही यात पडू नका, असा सल्ला तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटलांनी दिला. बिल्डरला जागा देण्याचा निर्णय त्यांनी बदलला, अशी माहिती बोरवणकरांनी यावेळी दिली. 'मॅडम कमिशनर' या पुस्तकातल्या आरोपांचा पुनरुच्चार त्यांनी केला.


जमीन कुणी कुणाला दिली याची चौकशी झाली पाहिजे; रोहित पवारांची मागणी


 मीरा बोरवणकर यांनी अजित पवारांवर आरोप केल्यानंतर आमदार रोहित पवारांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांविरोधात दंड थोपटले आहेत. जमीन कुणी कुणाला दिली याची चौकशी झाली पाहिजे. सरकारने याची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी रोहित पवारांनी केलीय. पुण्याचे तत्कालीन पालकमंत्री दादांनी पोलिसांची जमीन बिल्डरला देण्यास सांगितले होते मात्र आपण नकार दिल्याचा दावा बोरवणकरांनी आपल्या पुस्तकात केलाय. त्यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान पुस्तकाची चर्चा व्हावी आणि प्रसिद्धी झोतात येण्यासाठी मीरा बोरवणकरांनी अजितदादांवर खोटे आरोप केल्याची प्रतिक्रिया अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनी दिलीय. 


बोरवणकरांच्या गौप्यस्फोटामुळं अजित पवार अडचणीत?


पुण्याच्या माजी पोलीस आयुक्त  मीरा बोरवणकर यांनी आपल्या मॅडम कमिशनर पुस्तकात धक्कादायक गौप्यस्फोट केलाय. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं नाव न घेता त्यांनी पुस्तकात गंभीर आरोप केलेत आहेत. ‘दादा’ म्हणत होते पोलिसांची जमीन बिल्डरला द्या, मात्र मी म्हणाले, देणार नाही. असा गौप्यस्फोट बोरवणकरांनी केला आहे. 


एक दिवस मला विभागीय आयुक्तांचा कॉल आला. त्यांनी सांगितलं पुण्याचे पालकमंत्री दादा तुमच्याबद्दल विचारत आहेत. विषय येरवडा पोलीस स्टेशनच्या जमिनीचा होता. ठरल्याप्रमाणं मी पालकमंत्र्यांना विभागीय आयुक्तांच्या ऑफिसात भेटले. मंत्र्यांकडे जमिनीचा नकाशा होता. या जागेचा लिलाव झाला असून जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया पार पाडावी, असं त्यांनी सांगितलं. 


मी पालकमंत्र्यांना सांगितलं की, येरवडा पुण्यातील मध्यवर्ती ठिकाण आहे. भविष्यात मोक्याच्या ठिकाणी असलेली अशी जागा पुन्हा मिळणार नाही. ऑफिस आणि पोलीस वसाहतीसाठी आपल्याला या जागेची गरज आहे. तेव्हा मंत्र्यांचा पारा चढला आणि त्यांनी काचेच्या टेबलावर नकाशा फेकला. मी त्यांना सॅल्यूट केला आणि बाहेर पडले. बोरवणकरांनी हा किस्सा सांगताना पुस्तकात केवळ 'पालकमंत्री दादा' असा उल्लेख आहे. 2010 सालचं हे प्रकरण आहे... त्यावेळी अजित पवार हेच पुण्याचे पालकमंत्री होते... त्यामुळं येरवड्याची ३ एकर जागा बिल्डरला देण्याचा आग्रह धरणारा हा पालकमंत्री दादा कोण, यावरून राजकारण सुरू झालंय..