मुंबई: राज्यात बळीराजावर पुन्हा संकट येणार आहे. याचं कारण म्हणजे पुन्हा एकदा राज्यात अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. ठाणे आणि पालघर जिल्ह्यात तुरळक स्वरुपाचा पाऊस पडणार असल्याचा तर उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागात मुसळधार पावासाचा इशारा देण्यात आला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

धुळे आणि ठाणे जिल्ह्यात 8 जानेवारीला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.  8 आणि 9 जानेवारी रोजी जळगाव आणि नाशिक जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडेल. याशिवाय औरंगाबाद, जालना आणि परभणी जिल्ह्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. 


बीड, हिंगोली, नांदेड, अकोल, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, नागपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा जिल्ह्यात पुढचे तीन दिवस पाऊस असणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अलर्ट देण्यात आला आहे. 


कोरोना आणि अवकाळी पावसानं शेतकऱ्यांचं आधीच नुकसान झालं आहे. आता पुन्हा एकदा अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवलं आहे.