MHADA Lottery News : कोकण मंडळाची (Mhada Konkan Lottery 2023) पावणे पाच हजार घरांसाठी लवकरच सोडत काढण्यात येणार आहे. (Mhada Lottery 2023) ठाण्यातील ( Thane) विहंग प्रकल्पात 256, तर विरारमध्ये ( Virar) 300 सदनिकांची भर पडली आहे. त्यामुळे आता 4721 घरांसाठी म्हाडाची लॉटरी काढण्यात येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Mhada Lottery : मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी मोठी बातमी, 16 ते 44 लाख रुपयांत घर


म्हाडा सोडतीमधील घरांची संख्या वाढली


कोकण मंडळाच्या घरांसाठी 2022 मध्ये सोडत काढण्यात येणार होती. मात्र, ही प्रक्रिया आणि संगणकीय प्रणालीतील बदलाची प्रक्रिया सुरू झाल्याने सोडत काढण्यात आली नाही.  पण, आता नवीन सोडत प्रक्रिया आणि नवीन संगणकीय प्रणाली कार्यान्वित झाल्याने सोडतीचा मार्ग मोकळा झाला.  म्हाडा कोकण मंडळाच्या सोडतीमधील घरांची संख्या वाढली असून   4721 घरांसाठी सोडत काढण्यात येणार आहे. 


Mhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या


ठाण्यातील विहंग समूहाच्या प्रकल्पातील 20 टक्के योजनेतील 256 आणि ठाणे महानगरपालिकेकडून मिळालेल्या पंतप्रधान आवास योजनेतील  300  घरांची त्यात भर पडली आहे. याअनुषंगाने जाहिरातीत काही बदल करावे लागणार असल्याने ही जाहिरात आणखी चार-पाच दिवस लांबणीवर पडली आहे.


17 ते 20 लाख रुपयांत घरे होणार उपलब्ध


म्हाडाच्या घरांसाठी कोकण मंडळाने सुमारे 4000 घरांसाठी या आठवड्यात सोडत काढण्याची तयारी केली होती. परंतु 20 टक्क्यांतील आणि पंतप्रधान आवास योजनेमधील सुमारे 550 नवीन घरे नुकतीच मंडळाला उपलब्ध झाली आहेत. त्यामुळे ही 500 घरे यात समाविष्ट करण्यात आली आहेत. त्यामुळे आता घरांची संख्या वाढली आहे. ही वाढीव घरे अल्प गटासाठी असून अंदाजे 300 चौरस फुटांची आहेत. त्याची किंमती 20 लाख रुपयांपर्यंत आहे. यासह विरार महानगरपालिकेकडून पंतप्रधान आवास योजनेतील अंदाजे 300  घरे म्हाडाला प्राप्त झाली आहेत. ती अत्यल्प गटासाठी असून या घरांचे क्षेत्रफळ अंदाजे 300 चौरस फूट आहे. घरांची अंदाजित किंमत 17 लाख रुपयांच्या घरात आहे.


Mhada Lottery : आता 21 नाही तर केवळ 6 कागदपत्रं जमा करा आणि घ्या घर