Mhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या

Mhada Lottery News :  मुंबई, पुणे येथे घर घेणाऱ्यांचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र, म्हाडाने आपल्या नियमांत बदल केले आहेत. त्यामुळे घरांसाठी अर्ज करताना आधी नियम जाणून घ्या.

Updated: Jan 13, 2023, 10:48 AM IST
Mhada Lottery 2023 : घरासाठी अर्ज करत आहात, आधी बदलेल्या म्हाडा नियमांबाबत जाणून घ्या title=
Mhada Lottery 2023

Mhada Lottery : नव्या नियमानुसार आता म्हाडा घरांसाठी लॉटरी काढणार आहे. त्यामुळे म्हाडाचे घर घेणाऱ्यांना आधी कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. (Mhada Lottery 2023) जर एखादे कागदपत्र नसेल तर तुम्हाला घर मिळणार नाही. त्यामुळे नियम प्रथम जाणून घ्या आणि नंतर तुम्ही घरासाठी अर्ज करा. नंतर तुम्हाला टेन्शन नको. (Mhada Lottery News in MArathi)

म्हाडाने काही नियमांमध्येही केलाय बदल 

जगभरात कोरोनाने धुमाकूळ घातला होता. देशात दोन वर्षांपासून जवळपास सगळंच ठप्प होतं. आता कोरोनानंतर पहिल्यांदाच म्हाडाने मोठी लॉटरी काढत आहे. मुंबई, पुणे, नागपूर इथे म्हाडाकडून ही लॉटरी काढण्यात येणार आहे. यासाठी अर्ज करण्याची आणि प्रोसेसिंग फी भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. ही सगळी प्रक्रिया ऑनलाईन करण्यात आली आहे. आता अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 5 फेब्रुवारी अणार आहे. म्हाडाच्या घरांसाठी लॉटरी फेब्रुवारी- मार्च दरम्यान काढली जाणार आहे. 

Mhada Lottery : आता 21 नाही तर केवळ 6 कागदपत्रं जमा करा आणि घ्या घर 

म्हाडाचे घर घेताना याआधी लॉटरी पद्धतीने निवड झाल्यावरअर्जदारांना आपली कागदपत्रे द्यावी लागत होती. एखादे कागदपत्र नसेल तर तुम्हाला सादर करायला पुढची वेळ दिली जात होती.  आता तसे नाही. आधी कागदपत्रे पूर्ण केली तरच घर मिळणार आहे. तसेच लॉटरी पद्धतीत भाग घेता येणार आहे. पूर्वीच्या तुलनेत अर्ज करणाऱ्याला आता अर्ज करताना त्यांची कागदपत्रे सादर करावी लागणार आहेत. त्यामध्ये विलंब झालेला चालणार नाही. 

नियमात बदल करण्यामागचे कारण म्हणजे...

म्हाडा अल्प, मध्यम आणि उच्च अशा तिन्ही उत्पन्न गटांसाठी ही लॉटरी काढण्यात येणार आहे. दरम्यान, नियमात बदल करण्यामागचे कारण म्हणजे त्यामध्ये होणारे घोटाळे आणि भ्रष्टाचाराला आळा घालणे हा त्यामागचा उद्देश आहे. म्हाडाकडून याआधी घरांसाठीची लॉटरी ही मॅन्यूअली काढली जात होती. मात्र त्यामध्ये अनेक गैरव्यवहार होऊ लागले. सिडकोने शून्य मानवी हस्तक्षेप असलेली पूर्ण सिस्टिमवर चालणारी व्यवस्था सुरु केली.  कागदपत्र पडताळणीतला मानवी हस्तक्षेपच काढून टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. संपूर्ण यंत्रणा आता सिस्टिम बेस ठेवण्यात आली आहे.