पुणे : Mhada - TET Exam : म्हाडा आणि शिक्षकभरती गैरव्यवहारात पकडलेल्या काही एजंट्सचा महाराष्ट्रासह कर्नाटक आणि बिहारमधील परीक्षांमध्येही गैरव्यवहार असल्याचं समोर आले आहे. (Mhada - TET Exam  Scam)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एका आरोपीने कर्नाटक-बिहारमधील 40 परीक्षा केंद्रांमध्ये छेडछाड केल्याचं उघड झाले आहे. ही 40 केंद्रही आता पोलिसांच्या रडावर आहेत. (Scams in exams in Karnataka and Bihar With Maharashtra )


परीक्षेत छेडछाड करण्यासाठी बिहारमध्ये प्रशिक्षण दिलं जात असल्याची माहती असून त्यादृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. धक्कादायक बाब म्हणजे अटकेतील एजंट गेल्या 15 वर्षांपासून हा सगळा कारभार करत होते. 


दरम्यान, TET Exam Scam : शिक्षक भरती घोटाळा प्रकरणात नाशिक आणि पुणे सायबर पोलिसांची मोठी कारवाई केली होती. शिक्षक पात्रता  परीक्षा प्रकरणात आणखी तिघांना अटक करण्यात आले आहे. उमेदवारांकडून पैसे घेऊन अधिकाऱ्यांना पुरवल्याचं उघड झाले आहे. यात एक सब एजंटचा समावेश आहे. तो एक शिक्षक होता.


या घोटाळ्यात (Scams in exams) दलालांनी अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन ते वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलेत. यात राज्यातील सात हजार 800 अपात्र उमेदवारांकडून पैसे घेऊन त्यांना पात्र ठरविण्यात आल्याचे तपासात उघड झाले आहे. आता या प्रकरणी आरोपींना न्यायालयाने पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.