Vada Pav Price will Expensive: सर्वसामान्यांच्या सर्वात आवडीचा पदार्थ असलेल्या वडापावमुळे त्यांना खिशाला कात्री लावावी लागणार आहे. तमाम वडापावप्रेंमींच्या डोक्याला ताण देणारी बातमी समोर आली आहे. आवडता वडापाव महागण्याची शक्यता आहे. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.  वडापावच्या किंमती 1 ते 2 रुपयांनी महागण्याची शक्यता आहे. पावाचे दर वाढल्यास याचा परिणाम वडापावच्या किंमतींवरही दिसू शकतो. तेल, बेसन, पाव महाग झाल्याने वडापाव महागण्याची शक्यता आहे. सर्वसामान्यांच्या मनाच्या जवळ असलेल्या वडापावलाही महागाईची झळ बसणार? 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

24 डिसेंबर पासून पावाचे दर वाढवण्याचा निर्णय बदलापूर बेकरी असोसिएशन घेतलाय. त्याची झळ सर्वसामान्यांच्या वडापावलाही बसण्याची शक्यता आहे. तेल कांद्यापाठोपाठ पावही महागल्यास वडापाव 1 ते 2 रुपयांनी महाग होऊ शकतो अशी माहिती वडापाव विक्रेत्यांनी 'झी 24 तास'ला दिलीय. सध्या दुकानात साधारणपणे एक वडापाव 14 ते 15 रुपयांना मिळतो. याची किंमत आता आता 18 ते 20 रुपयांपर्यंत पोहोचू शकत. साधे वडापावविक्रेते एक वडापाव 12 रुपयांना विकतात. हा वडापाव 14 ते 15 रुपये किंमतीला मिळू शकतो. 


का वाढतायत किंमती?


2023 पर्यंत पावासाठी लागणाऱ्या मैद्याच्या 50 किलोचे पोते 1200 ते 1400 रुपये किंमतीला मिळत होते. त्याचा दर आता 1600 रुपयांच्या घरात पोहोचला आहे. पावाच्या भट्टीसाठी लागणाऱ्या इतर सामानाच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. डिझेल दरवाढीचा परिणाम सर्वच स्तराला बसलाय. यामुळे वाहतूक महागली आहे. आणि पर्यायाने सर्वच गोष्टी महागत चालल्या आहेत. या सर्वांमुळे पावाच्या उत्पादनापासून ते विक्रीपर्यंत खर्चात वाढ झालेली दिसून येत आहे.