Milk Adulteration : तुम्ही दूध पित असाल तर सावधान. तुम्ही पीत असलेलं दूध तुमच्य़ासाठी विष ठरु शकतं. राज्यात भेसळयुक्त दुधाचा पूर आलाय.. दूध भेसळ करणाऱ्या अशाच एका रॅकेटचा बीडच्या आष्टी तालुक्यात पर्दाफाश करण्यात आलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आष्टीच्या संभाजीनगर परिसरातून 132 गोण्या रासायनिक पावडर आणि 220 पाम तेलाचे डबे जप्त करण्यात आलेत. एका कारसह एकूण 9 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. धक्कादायक म्हणजे दूधभेसळ छाप्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विधानसभेतही भेसळीचा मुद्दा चांगलाट गाजला.


यावेळी अजित पवार म्हणाले, राज्यात दूधाच्या उत्पादनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. येत्या काही काळात राज्यात एक कोटी लीटरपर्यंत दूधाचे कलेक्शन जाण्याची शक्यता आहे. मात्र दूध व्यवसायात काही अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. दूध भेसळ करणाऱ्यांचं मोठं सामाज्र पसरलं आहे. ही बाब गंभीर आहे.



पवार पुढे म्हणाले की, दूध भेसळ करुन लहानग्यांच्या, सर्वसामान्य जनतेच्या जीवाशी खेळण्याचा प्रकार सुरु आहे. आघाडी सरकारच्या काळात दूध भेसळ करताना सापडल्यास त्याला फाशीची शिक्षा करण्याची तरतूद करण्याचा कायदा प्रस्तावित होता. परंतु राष्ट्रपती महोदयांनी या कायद्याला परवानगी दिली नाही. मात्र दूध भेसळ करणाऱ्याला फाशीची तरतूद करावी. याशिवाय दुधाच्या व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी अतिरिक्त दूध उत्पादनाच्या काळात सहकारी संस्थांना पावडर करुन ती एक्सपोर्ट करण्याची परवानगी द्यावी.


भेसळयुक्त दूध कसं ओळखाचं?


  • भेसळयुक्त दुधाची चव कडू लागते

  • बोटांच्या दरम्यान चोळले की ते साबणासारखे वाटते

  • गरम झाल्यावर ते पिवळे होते

  • दूध बाटलीत घेऊन जोरात हलवलं तर त्याला फेस होतो


भेसळयुक्त दूध म्हणजे लहान मुलांच्या आरोग्याशी खेळच. भेसळखोरांविरोधात अनेक कायदे करण्यात आलेत. पण भेसळीचं प्रमाण कमी होत नाही. त्यामुळं दूध विकत घेताना ते भेसळयुक्त तर नाही ना याची खात्री करुन घ्या.