बीड : Chemical Milk : आता तुम्हाला सावध करणारी बातमी. तुम्ही पित असलेल्या दुधात कुणीतरी विष कालवत आहे का? बीडच्या पाटोदा तालुक्यातील पारनेरजवळील नागेशवाडीत हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केमिकलयुक्त दूध विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

केमिकलपासून बनावट दूध तयार करून डेअरीवर विकणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात बीड पोलिसांना यश आले आहे. आरोग्याला हानिकारक केमिकलपासून दूध तयार करण्यात आले आणि 160 लिटर दूध डेअरीवर विकत असताना पोलिसांनी ही कारवाई केली.केमिकलपासून बनविलेल्या दुधाची डेअरीवर (Chemical milk) विक्री करणाऱ्या व्यक्तीला सहायक अधीक्षक पंकज कुमावत यांच्या पथकाने छापा टाकून पकडले. 


आप्पासाहेब हरिभाऊ थोरवे हा स्वतःच्या फायद्याकरता केमिकल पावडर पासून दूध तयार करून तो भेसळ करून डेअरी वर विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार ही कारवाई केली. यावेळी हा सगळा मुद्देमाल, केमिकल, पावडर जप्त करण्यात आला आहे. आप्पासाहेब थोरवे या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, याचे आणखी कुणी साथीदार आहे का ? याचा पोलीस शोध घेत आहेत. याचा विषारी दूधाचा धंदा किती दिवसांपासून सुरू होता? याचाही तपास पोलीस करत आहेत. मात्र, या कारवाईमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.