औरंगाबाद : MIMचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज ठाकरे यांना इफ्तार पार्टीचं आमंत्रण दिलं आहे. 'ते पाहुणे आहेत. त्यामुळे 1 मेच्या सभेला जाण्यापूर्वी इफ्तार पार्टीला यावं, असं जलील म्हणाले आहेत. जातीय सलोखा राखण्यासाठी राज ठाकरे यांनी पुढाकार घ्यावा असंही त्यांनी नमूद केलं आहे. त्यामुळे राज ठाकरे त्यांचं निमंत्रण स्वीकारणार का याकडे लक्ष लागलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे यांच्या जाहीर सभेआधी सभेच्या पार्श्वभूमीवर MIM खासदार जलील यांनी औरंगाबादच्या पोलीस आयुक्तांची भेट घेतली. शहरात शांतता राहिली पाहिजे, या उद्देशानं ही भेट घेतल्याचं जलील यांनी सांगितलं आहे.


औरंगाबादच्या सभेसाठी राज ठाकरे दुपारच्या सुमारास पुण्यात दाखल झाले आहेत. शिवतीर्थावर मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केल्यानंतर राज ठाकरे पुण्याच्या दिशेने रवाना झाले. त्यावेळी चेंबूरमध्ये कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंची जोरदार स्वागत केलं. कार्यकर्त्यांनी पुष्पवृष्टी करून फटाक्यांची आतषबाजी केली.


नवी मुंबईत वाशीमध्येही कार्यकर्त्यांनी राज ठाकरेंचं स्वागत केलं. पुढे पनवेलमध्येही मनसे कार्यकर्त्यांनी स्वागत केलं. आज राज ठाकरेंचा पुण्यात मुक्काम असून, उद्या ते औरंगाबादला रवाना होणार आहेत.