मुंबई : 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष केल्याबद्दल माफ करा असं म्हणत एमआयएमचे आमदार वारीस पठाण यांनी मुस्लीम समाजाची माफी मागितलीय... यामुळे नव्या वादाला तोंड फुटलंय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही दिवसांपूर्वी वारीस पठाण एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात गणपती दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्यांनी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष केला होता.


बाप्पाने तुमची सर्व विघ्ननं दूर करावीत, तुमच्या मार्गातले अडथळे दूर व्हावेत, सगळ्यांना आनंद घ्यावा, असं वारीस पठाण म्हणत असल्याचे या व्हिडीओत पाहायला मिळतंय.


आता समोर आलेल्या एका व्हिडिओत वारीस पठाण मुस्लीम समाजाची माफी मागताना दिसत आहेत.