सरकार दुश्मन आहे, अशा भूमिकेत काम करण्याचं काही कारण नाही - चंद्रकांत पाटील
Maratha Reservation : मराठा आरक्षणवारुन राज्यात पुन्हा एकदा मोठं आंदोलन पेटण्याची शक्यता आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणानंतर सरकारने आरक्षण देण्याबाबत सावध भूमिका घेतली आहे.
Maratha Reservation : सध्या मराठा आरक्षण हा राज्यातील एक ज्वलंत विषय बनत चालला आहे.मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता संपूर्ण मराठा समाज (Maratha Aarkashan) एकवटला आहे. राज्यभर याचे पडसाद उमटताना दिसत आहेत. शिवाय आता आरक्षण घेतल्याशिवाय शांत बसणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी सरकारला दिला आहे. शासनाने मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, हे शांततेत होणारं आंदोलन सरकारला पेलणारं नाही असा इशारा जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) सरकारला दिला.
अशातच राज्यभर मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजत असून मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मराठा आरक्षणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी पत्रकारांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यात त्यांनी मराठा समाज आरक्षणाबाबत विविध मुद्दे उपस्थित केले आहेत.
पुण्यात मराठा समाजाने आरक्षणासाठी एल्गार पुकारला आहे. त्यावर जरांगेंनी यावं, बसावं आणि कायद्याची बाजू समजून घ्यावी असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी केलं आहे. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना त्यांनी उत्तर दिले. काल राज्य सरकारची महत्वाची बैठक पार पडली. मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विचार केला पाहिजे की आरक्षण टीकणारं हवंय की दिलेलं हवं, अभ्यासकांनी सुद्धा काही इनपुट देऊन सरकारला मदत केली पाहिजे, असं आवाहन चंद्रकांत पाटलांनी मनोज जरांगेंना केलं आहे.
4 हजार मराठा तरुणांना रोजगार
मराठा समाजातील 4 हजार तरुणांना आरक्षण देऊन त्यांना नोकरी सुद्धा सरकारने दिली आहे. याशिवाय आरक्षण दिल्यानंतरही सरकार आपलं दुश्मन आहे अशा भूमिकेत काम करण्याचा काही कारण नाही असा सल्लाही चंद्रकांत पाटील यांनी जरांगे यांना दिला आहे. तज्ञांच्या म्हणण्यानुसार आत्ता तुम्हाला हे राजकीय आरक्षण देता येईल पण गायकवाड कमिशनने अभ्यास करून दिलेलं नाही त्यामुळे टिकणारं आरक्षण देण्याचं प्रयत्न सरकारचा आहे, असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.
चंद्रकांत पाटलांची प्रतिक्रिया
"मी असं म्हणेण की सरकार प्रामुख्याने 24 तारखेच्या आधी काय करतयं हे पाहणं महत्वाचं ठरणारं आहे. मराठा समाजाला कुणबीतून (OBC)आरक्षण देताना ते टिकणारं असलं पाहिजे त्यामुळे इतर समाजांवर अन्याय होता कामा नये याचा विचार देखील केला पाहिजे. हे सरकार प्रामाणिक आहे ते काही थातूर-मातूर काही करणार नाही. त्यामुळे मनोज जरांगे पाटलांनी सरकारला वेळ द्यावा," असे चंद्रकांत पाटलांनी म्हणाले.