बीड: सहकार मंत्री सुभाष देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यांचं बेकायदेशीर बांधकाम जमिनदोस्त करावं अशी मागणी विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी केली आहे.  सुभाष देशमुख यांनी शासकीय जमिनीवर स्वतःचा बंगला बांधला आहे,याबाबत सोलापूर महापालिकेने अहवाल दिल असून त्यात देशमुख हे दोषी असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे सगळ्या भ्रष्ट मंत्र्यांना क्लीन चिट देणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी एकनाथ खडसे यांच्याप्रमाणे देशमुख यांचा राजीनामा घ्यावा असे मुंडे यांनी म्हटले आहे.


सहकारमंत्र्यांकडून राजीनाम्याचे संकेत


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरक्षीत जागवेर बंगला बांधल्याबाबतच्या प्रकरणाचा पालिका आयुक्तांनी दिलेला अहवाल विरोधात गेल्याने राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख चांगलेच अडचणीत आले आहेत. या प्रकरणात देशमुख जोरदार अडकण्याची चिन्हे आहेत. दरम्यान, देशमुख यांनी या प्रकरणावरून झी चोवीस तासशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली. मात्र, ही भूमिका स्पष्ट करताना देशमुख यांनी आपल्या मंत्रीपदाच्या राजीनाम्याचे संकेतही दिले.


... तर काही सेकंदातच राजीनामा


बेकायदेशीर बंगला प्रकरणावरून सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधक आहेत, असा प्रश्न देशमुख यांना विचारण्यात आला होता. दरम्यान, या प्रश्नाला उत्तर देताना विरोधकांचे काय माझ्या पक्षनेतृत्वाने आदेश दिल्यास मी पदाचा काही सेकंदाद राजीनामा देईल, असे देशमुख यांनी सांगितले. तसेच, आपण प्रामाणिक कष्ट केले आहे. पण, त्यात जर आपण दोषी ठरलो तर, बंगलाही पाडून टाकू. त्यात येवढे काय! असेही देशमूख म्हणाले.