MLA Geeta Jain : मीरा-भाईंदर येथील भाजप आमदार गीता जैन (MLA Geeta Jain) यांची  दबंगगिरी समोर आली आहे. गीता जैन यांनी भररस्त्यात एका तरुण इंजिनिअरच्या  कानाखाली लगावली आहे. अनधिकृत बांधकामावरील कारवाईवरून गीता जैन आणि इंजिनिअरमद्ये वाद झाला होता. याच वादातून गीता जैन यांनी इंजिनिअर कॉलर पकडून त्याला कानशिलात लगावली आहे. गीता जैन इंजिनिअरला मारहाण करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वसई विरार महापालिकेतील प्रभाग समिती सहाचे इंजिनिअर शुभम पाटील आणि संजय सोनी अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेले होते. यावेळी आमदार गीता जैन यांनी त्यांना चांगलंच झापलं. यावेळी गीता जैन दोघांना ओरडत असताना इंजिनिअर शुभम पाटील हसल्यानं गीता जैन यांना राग अनावर झाला आणि त्यांनी पाटील यांची थेट कॉलर पकडून त्यांच्या कानाखाली लगावली.  अनधिकृत बांधकाम कारवाईच्या वादातून हा संपूर्ण प्रकार घडला आहे. मारहाणीची दृश्य मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहेत.


शुभम पाटील आणि संजय सोनी हे दोघे इंजिनीयर अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी गेले असताना आमदार गीता जैन या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यावेळी आमदार गीता जैन हे कारवाई वरून दोन्ही अभियंत्यांना ओरडत असताना इंजिनियर शुभम पाटील हसल्याने गीता जैन यांचा राग अनावर झाला व त्यांनी थेट कॉलर पकडून इंजिनियर शुभम पाटील यांच्या कानाखाली लगावली. हा सर्व प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाला आहे.


अवैध डान्स बार आणि लॉजिंग हॉटेल्सवर कारवाई करण्याची गीता जैन यांची मागणी


मीरा भाईंदर महापालिकेनं शहरातील अवैध डान्स बार आणि लॉजिंग हॉटेल्सवर बुलडोजर चालवायला सुरुवात केली आहे.  कारवाईत  स्टे इन, रॉकस्टार आणि मॅडनेस हे 3 बार पाडण्यात आले. शिवसेना आमदार प्रताप सरनाईक आणि आमदार गीता जैन यांनी पालिका आयुक्तांकडे शहरातील अवैध डान्स बार आणि लॉजिंग हॉटेल्सवर कारवाईची मागणी केली होती. 


गीता जैन यांना घेराव


बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमात चोरीच्या घटनांनंतर संतप्त महिला आयोजकांवर आक्रमक झाल्यात. महिलांचे चोरी झालेल्या दागिन्यांची तक्रार घेण्यास पोलीस टाळाटाळ करत असल्याने संतप्त महिलांनी आयोजक आमदार गीता जैन यांना घेराव घातला. यावेळी गीता जैन आणि महिलांमध्ये शाब्दिक बाचाबाचीही झाली होती.