Mira Bhayander Job: मिरा भाईंदर महानगरपालिकामध्ये विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी बारावी उत्तीर्ण ते एमडी रेडीओलॉजीपर्यंतचे शिक्षण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. पदासाठी लागणारी पात्रता, वयोमर्यादा, अर्जाची शेवटची तारीख याचा सविस्तर तपशील अधिकृत वेबसाइटवर देण्यात आला आहे. उमेदवारांना त्यांच्या पदानुसार पगार दिला जाणार आहे. 

 

मीरा भाईंदर पालिकेत विविध पदांच्या एकूण 27 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत क्ष किरण तज्ञचे 1 पद, बालरोग तज्ञचे 1 पद, सुक्ष्मजीव शास्त्रज्ञचे 1 पद, पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारीची 5 पदे, साथरोग तज्ञचे 1 पद, दंतशल्य चिकित्सकचे 1 पद, परिचारिका ( स्त्री ) ची 5 पदे, परिचारिका ( पुरुष ) ची 2 पदे,  प्रयोगशाळा तंत्रज्ञची 4 पदे, औषध निर्माताचे 1 पद,  ओटी असिस्टंटचे 1 पद भरले जाणार आहे. 

 

क्ष किरण तज्ञ पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने एमडी रेडिओलॉजी/डीएमआरडी पूर्ण केलेले असावे. बालरोग तज्ञ पदासाठी डीसीएच/डीएनबीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे. सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ पदासाठी उमेदवाराने एमडी मायक्रोबायलॉजीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले असावे.  पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारी पदासाठी उमेदवाराने 

 

साथरोग तज्ञसाठी वैद्यकीय क्षेत्रातील पदवी असणे आवश्यक आहे. दंतशल्य चिकित्सकसाठी बीडीएस आणि दोन वर्षांचा अनुभव असणे गरजेचे आहे. परिचारिका ( स्त्री ) आणि परिचारिका ( पुरुष ) साठी बीएससी नर्सिंग पूर्ण असावे.  प्रयोगशाळा तंत्रज्ञसाठी डीएमएलटी आणि बीएससी पूर्ण असणे आवश्यक आहे. औषध निर्माता पदासाठी एमपीसीआर नोंदणीसह डी फार्मा पूर्ण असावे. प्रसविका पदासाठी एएनएम नोंदणी असावी.  ओटी असिस्टंटसाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पगार


क्ष किरण तज्ञ, बालरोग तज्ञच आणि सुक्ष्मजीव शास्त्रज्ञ पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 75 हजार रुपये पगार दिला जाणार आहे. 

 

पुर्णवेळ वैद्यकीय अधिकारीसाठी 60 हजार रुपये, साथरोग तज्ञसाठी 35 हजार, दंतशल्य चिकित्सकसाठी 30 हजार रुपये पगार दिला जाईल.

 

परिचारिका ( स्त्री ) आणि परिचारिका ( पुरुष ) साठी 20 हजार रुपये पगा दिला जाईल. 

 

प्रयोगशाळा तंत्रज्ञ आणि औषध निर्मातासाठी 17 हजार रुपये पगार दिला जाईल. प्रसविका पदासाठी 18 हजार रुपये तर ओटी असिस्टंटसाठी 15,500 रुपये पगार दिला जाणार आहे. 

अर्ज प्रक्रिया


उमेदवारांनी आपले अर्ज सार्वजनिक आरोग्य विभाग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, मांडली तलाव, तळ मजला, भाईंदर पश्चिम, ठाणे-401101 या पत्त्यावर पाठवायचे आहेत. 31 ऑगस्ट ही अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख आहे.