Mira Road Murder: मिरा रोडमध्ये (Mira Road) झालेल्या हत्याकांडामुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. मृतदेहाचे तुकडे केल्यानंतर ते कुकरमध्ये शिजवून नंतर कुत्र्यांना खाण्यास घालणे यावरुनच हा किती क्रूर प्रकार होता याची प्रचिती येत आहे. पोलिसांना जेव्हा घरातून दुर्गंध येत असल्याचा फोन आला तेव्हा त्यांनाही तिथे इतका निर्घृण प्रकार घडला असेल याची कल्पना नव्हती. दुर्गंध येत असल्याने जरी मृतदेह असला तरी तो सडलेला असावा अशी शंका असेल. पण जेव्हा पोलिसांना खोलीत प्रवेश केला तेव्हा तिथे जे काही दिसलं ते पाहून त्यांचाही थरकाप उडाला. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार अर्धवट कापलेला मृतदेह, घरभर पडलेले मृतदेहाचे तुकडे, किचनमध्ये शिजवण्यात आलेले मृतदेहाचे तुकडे हे सर्व पाहून काही पोलीस कर्मचारी उलट्या करु लागले होते. यावरुनच हा गुन्हा किती क्रूर आहे याची कल्पना येते.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सरस्वती वैद्य आणि मनोज साने हे कधीही आपल्या शेजाऱ्यांशी बोलत नव्हते. त्यामुळे इमारतीमधील फार कमी लोक त्यांना ओळखत होते. 15 वर्षांपूर्वी 32 वर्षीय सरस्वती वैद्य आणि 56 वर्षीय मनोज साने यांची भेट झाली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, दोघेही अहमदनगरमधील होते. तसंच दोघांकडे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचं (Industrial Training Institute) प्रमाणपत्र होतं. 


सरस्वतीने शाळा सोडली होती. आपल्या तीन बहिणींसह ती राहत होती. यादरम्यान तिची मनोज सानेशी भेट झाली आणि तिने त्याच्यासह राहण्याचा निर्णय घेतला. तिने लोकांनी हा आपला मामा असून फार श्रीमंत असल्याचं सांगितलं होतं. पाच वर्षांपूर्वी दोघेही मिरा रोडमधील इमारतीच्या 704 नंबर फ्लॅटमध्ये राहण्यास गेले होते. 


यादरम्यान त्यांनी कोणाशीही जवळीक वाढवली नव्हती. घरातून दुर्गंध येऊ लागल्याने पोलिसांना फोन करणाऱ्या सोमेश श्रीवास्तव याने तर आपल्याला त्यांचं नावही माहिती नसल्याचं सांगितलं आहे. दुर्गंध येत असल्याचा फोन आल्यानंतर पोलीस दरवाजा तोडून आत गेले असता याचं कारण उघड झालं. 


घरात जे काही चित्र होतं ते पाहिल्यानंतर काही पोलीस कर्मचारी उलट्या करु लागले होते. आपण अशा एखाद्या गोष्टीला सामोरं जात आहोत याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. लिव्हिंग रुममध्ये पडलेले मृतदेहाचे तुकडे, किचनमध्ये शिजवलेले मृतदेहाचे तुकडे हे चित्र पोलिसांचाही थरकाप  उडाला होता. 


सरस्वतीची रविवारी हत्या करण्यात आली. पोलिसांच्या माहितीनुसार, सरस्वती आपल्याला धोका देत असल्याचा मनोजला संशय होता. यावरुन दोघांचं कडाक्याचं भांडण झालं. दरम्यान मनोज साने याने पोलिसांना तिने विष घेऊन आत्महत्या केली आणि नंतर आपण आपण अडकले जाऊ या भीतीपोटी मृतदेहाचे तुकडे केल्याचा दावा केला होता. सरस्वती आपल्या मुलीप्रमाणे असल्याचंही त्याने पोलिसांना सांगितलं. 


मनोज याने हत्या करण्याचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. मात्र जे काही घडलं ते सर्वांचा थरकाप उडवणारं आहे. 


त्याने मृतदेह कापण्यासाठी डिझेलवर चालणारी इलेक्ट्रिक करवत खरेदी केली होती. याची कल्पना त्याला श्रद्धा वालकर प्रकरणातून आल्याचे पोलिसांना सांगितलं असल्याची माहिती मिळत आहे. मृतदेहाचे तुकडे भरण्यासाठी फ्लॅटभर काळ्या कचऱ्याच्या पिशव्या पसरल्या होत्या. दुर्गंधीमुळे आपण पकडले जाऊ अशी भीती असल्याने त्याने रूम फ्रेशनर मारला होता. तसंच कथितपणे मृतदेहाचे तुकडे उकळण्याचा आणि भाजण्याचा प्रयत्न केला. यामुळे विल्हेवाट लावणं सोपं जाईल असं त्याला वाटत होतं. त्याला शेजाऱ्यांनी मास्कमध्ये पाहिले होते. उंदीर मेल्यामुळए दुर्गंधी वाढत असावी असं त्यांना वाटत होतं. 


 


त्याचा शेजारी सोमेश श्रीवास्तव याने दार ठोठावल्यानंतर अखेर ही घटना उघडकीस आली. मनोज साने स्प्रे मारत असल्याचं त्याने ऐकलं. कोणीच उत्तर देत नसल्याने त्याने पोलिसांना बोलावले. मनोज साने याने पळून जाण्याचा प्रयत्न केला असताना पोलिसांनी शेजाऱ्यांच्या मदतीने त्याला पकडलं.