सांगली : मिरजेचे माजी आमदार हाफिज धत्तुरे यांच निधन झालं आहे.


हृदयविकाराच्या झटक्याने निधन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराचा झटका आल्याने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण मध्यरात्री दीड वाजता त्यांचं निधन झाले. ते 73 वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे.


वाढदिवशीच झालं निधन


खेदाची बाब म्हणजे आज त्यांचा वाढदिवस साजरा होणार होता. मिरज मतदार संघातून सलग दोन वेळा निवडून आलेले धत्तुरे स्वच्छ प्रतीमेचे लोकप्रतिनिधी म्हणून प्रसिद्ध होते. सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर ते आवाज उठवत, वेळ प्रसंगी ते रस्त्यावर उतरून आंदोलन करत असत.