MNS Loksabha Election : मुंबईपासून संभाजीनगरपर्यंत, ठाण्यापासून कोकण आणि विदर्भापर्यंतच्या उमेदवारांची चाचपणी मनसेनं (MNS) सुरू केलीय. मात्र त्यात सर्वाधिक चर्चा होतेय ती मनसेच्या मिशन बारामतीची (Baramati). पवारांचा गड असणाऱ्या बारामतीत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray) जोरदार बांधणी सुरु केलीय. पुण्यातील कात्रज परिसरात  मनसेच्या बारामती लोकसभा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन राज ठाकरेंनी स्वत: केलं. लवकरच बारामती लोकसभा मतदारसंघात राज ठाकरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार आहेत. मनसेचे माजी नगरसेवक वसंत मोरे हे बारामती लोकसभेसाठी मनसेचे उमेदवार असतील हे जवळपास निश्चित झालंय. बारामती मतदारसंघातील तालुक्यात वसंत मोरेंनी दौऱ्यांना सुरुवात केलीय. मात्र प्रश्न असा येतो की बारामतीवर राज ठाकरेंनी फोकस का केलंय, वसंत मोरेंचीच बारामतीचा शिलेदार म्हणून नेमणूक का केलीय? तर त्याची कारणंही इंटरेस्टिंग आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिशन बारामती, मोरेंची रणनीती
पुणे शहरासह जिल्ह्यात आताच्या घडीला वसंत मोरे हा मनसेचा लोकप्रिय चेहरा आहे. हडपसर मतदारसंघात वसंत मोरेंची ताकद आहे. भोर, खडकवासलात वसंत मोरेंची लोकप्रियता आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी संघर्षामुळे मनसेकडे लोकं वळतील असा विश्वास त्यांना आहे.  मोरेंसारखा डॅशिंग चेहरा उतरवत बारामतीत सुळेंविरोधात आव्हान उभं करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. पण वसंत मोरेंविरोधात पुणे शहरातील पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी आहेमोरेंविरोधातल्या नाराजीचा पुणे लोकसभा मतदारसंघात मनसेला फटका बसू शकतो. वसंत मोरेंचा प्रभाव हडपसरमध्ये असला तरी त्यांनी महिन्याभरात बारामती लोकसभा मतदारसंघाचे दौरे सुरु केलेत.


बारामतीत मनसेची म्हणावी तितकी ताकद बिलकुल नाही, मनसेची ताकद मुख्यत: पुणे शहरात आहे. तरीही राज ठाकरे बारामतीवर इतकं लक्ष केंद्रीत का करतायत? वसंत मोरेंसारखा मोहरा बारामतीसाठी का तयार करतायत? अजित पवार विरुद्ध शरद पवार संघर्षात बारामतीत मनसेचा निभाव लागेल का असे अनेक प्रश्न यानिमित्तानं चर्चेत आलेत.