बुलढाणा : देशातच नाही तर संपूर्ण जगात कोरोना व्हायरसने हाहा:कार माजवला आहे. गेल्या वर्षी भारतात दाखल झालेला कोरोना व्हायरसचं सावट दिवसागणिक वाढत आहे. काही महिन्यांपूर्वी मंदावलेल्या कोरोना रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असल्याचं समोर येत आहे. कोरोना रूग्णांची वाढत असल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा देखील सतर्क झाली आहे. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असताना बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांच्या कुटुंबातील 12जण कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आमदार गायकवाड यांची पत्नी, सून, 12 दिवसांची नात, दोन्ही पुतणे, गायकवाड यांच्या वहिनी, त्यांचे भाचे आणि परिवारातील आणखी काही सदस्य अशा 12 जणांचा कोविड अहवाल आज, 6 मार्चला पॉझिटिव्ह आल्यमुळे कुटुंबात भीतीचं वातावरण आहे. 



कुटुंबासोबतच आमदार गायकवाड यांच्या जनसंपर्क कार्यालयातील टाईप राइटर आणि चालक सुद्धा पॉझिटिव्ह आल्याने 11 मार्चपर्यंत त्यांचे कार्यालय सुद्धा बंद राहणार आहे. आमदार गायकवाड अधिवेशनासाठी मुंबईत असल्यामुळे ते स्वतः व त्यांच्यासोबतची टीम मात्र निगेटिव्ह आहे.