Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात की अपघात? राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा खळबळजनक आरोप!
MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident: बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी केली आहे.
Bacchu Kadu Accident : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील नेत्यांच्या अपघाताची मालिका सुरू असल्याचं पहायला मिळतंय. महाराष्ट्रात आणखी एका आमदाराचा अपघात झाल्याचं समोर आलं. शिंदे-फडणवीस सरकारचे सहकारी असलेले अपक्ष आमदार बच्चू कडू (Bacchu Kadu) यांचा अमरावतीत अपघात झाला. रस्ता ओलांडत असताना (Accident) बाईकने धडक दिल्यामुळे बच्चू कडू जखमी झाले. त्यानंतर राजकीय वर्तुळात ((Maharastra Politics) ) अनेकांना धक्का बसला आहे. राज्यात नेमकं चाललंय काय?, असा सवाल उपस्थित होत असताना राष्ट्रवादीच्या (NCP) बड्या नेत्याने खळबळजनक वक्तव्य केलंय. (MLA Amol Mitkari On Bacchu Kadu Accident Sensational allegation Maharastra Politics marathi news)
बच्चू कडू यांचा घातपात होता की अपघात याची चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी (MLA Amol Mitkari) यांनी केली आहे. सत्ताधाऱ्यांकडून हा घातपात करण्याचा प्रयत्न होता का?, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. आमदार बच्चू कडू मंत्रिमंडळ विस्तारावरून नारज होते. त्यांनी नाराजी जाहीरपण व्यक्त देखील केली होती. हा अपघात झाला की याच लोकांनी घडवून तर नाही आणला?, असा प्रश्न विचारत त्यांनी खळबळजनक आरोप देखील केला आहे.
लोकशाहीला पायदळी तुडवण्याचं काम करणारे हे लोक आहेत. लोकं वाट पाहतायेत. जर असं राजकारण हे करत असतील महाराष्ट्रातील जनता 2024 ला त्यांना सत्तेवरून खेचल्याशिवाय राहणार नाही, असे खडेबोल देखील त्यांनी (Bacchu Kadu On Bacchu Kadu Accident) यावेळी सुनावले आहेत.
दरम्यान, दरम्यान, मागील 22 दिवसांत महाराष्ट्रातील तीन आमदारांच्या कारला अपघात झाला आहे. भाजप आमदार जयकुमार गोरे (BJP MLA Jayakumar Gore), राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे (NCP MLA Dhananjay Munde) आणि शिंदे गटाचे आमदार योगेश कदम (Shinde Group MLA Yogesh Kadam) यांच्या कारला अपघात झाला. (Car Accident) या अपघतात तिन्ही आमदार जखमी झाले आहे. त्याआधी 14 ऑगस्ट 2022 रोजी शिवसंग्रामचे नेते तथा आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांचे कार अपघातात निधन झालं होतं. त्यानंतर आता अपघाताची मालिका थांबणार तरी कधी असा सवाल उपस्थित केला जातोय.