मुंबई : विधानसभा निवडणुकीत बच्चू कडूंच्या प्रहार संघटनेनं शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यानंतर आता इतर ४ अपक्ष आमदारांनीही शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे. त्यामुळे शिवसेनेची संख्या ६० वर पोहोचली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल मातोश्रीवर भेट घेऊन प्रहार जनशक्तीच्या दोन आमदारांनी पाठिंबा दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत आमदार बचू कडू आणि आमदार राजकुमार पटेल यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला. विधानसभा निवडणुक निकालानंतर रामटेकचे अपक्ष आमदार आशिष जयस्वाल आणि भंडाराचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेला पाठिंबा जाहीर केल्यावर आता प्रहार जनशक्तीच्याही दोन आमदारांनी शिवसेनेला जाहीर पाठिंबा दिलां आहे. त्यामुळे शिवसेना समर्थक आमदारांची संख्या आता ६० झाली आहे.


शिवसेनेकडून ५०-५० अशी सत्तावाटपाची मागणी केली जात आहे. दुसरीकडे आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसैनिकांकडून दबाव वाढत आहे. आमदारांच्या बैठकीतही सगळ्यांनी हाच सूर गवसला. आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्री करण्यासाठी शिवसेना आमदार प्रयत्नशील आहेत. शिवसेना किंगमेकरच्या भूमिकेत असल्याने शिवसेनेला उपमुख्यमंत्रिपद मिळतं की अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद हे अजून स्पष्ट झालेलं नाही.