MLA Bachchu Kadu : गेल्या काही दिवसापासून बच्चू कडू यांनी राज्याच्या राजकारणात एकच वादळ उठवलं. खुद्द देवेंद्र फडणवीसांना बच्चू कडू यांच्या समर्थनात पत्रकार परिषद घ्यावी लागली होती. त्यानंतर आता बच्चू कडू यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. त्यावेळी त्यांनी चौफेर फटकेबाजी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आम्ही कोणाच्या वाटेला जात नाही आणि गेलं तर सोडत नाही, असं बच्चू कडू म्हणाले. जलीको आग केहते है म्हण बच्चू कडू यांनी भाषणाची सुरूवात केली. साडेतीनशे गुन्हे डोक्यावर घेऊन फिरतो. उगाच बच्चू कडू 4 वेळा निवडून येत नाही. सत्ता गेली चुलीत...आमचा पक्ष आंडूपांडूचा पक्ष नाही, असंही बच्चू कडू म्हणाले.


शरद पवारांनी 2014 ला भाजपला पाठिंबा दिला. त्यावेळी त्यांची गरज होती. आज जे बंडखोर आहेत तेच पहिल्या पंगतीत आहे, असं म्हणत त्यांनी खोचक टीका केली आहे. कोणी यावं आणि आम्हाला काही म्हणावं एवढं आम्ही सोपं नाही. प्रहारचा वार त्यांना सोसणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला आहे.


दरम्यान, आम्ही उगाच गुवाहटीला गेलो नाही. यावेळी माफ करतो यापुढे करणार नाही, असं म्हणत त्यांनी थेट इशारा दिलाय. मंत्रीपद सोडलं पण मुद्दा सोडला नाही. आम्ही गुवाहाटीला गेलो म्हणून आम्हाला बदनाम केलं जात आहे. आम्ही गुवाहाटीला का गेलो? माझ्याकडे मंत्रिपद होतं. मंत्रिपद सोडून कोण जातं का?, असा सवाल बच्चू कडू यांनी यावेळी उपस्थित होतोय.