Vidhan Sabha Election 2024 : राज्यातील राजकीय समीकरणं क्षणाक्षणाला बदलत असतानाच यामध्ये काही समीकरणं नव्यानं उदयास येताना दिसत आहेत. इथं बड्या पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केलेली असतानाच तिथं याच बड्या पक्षांना दणका बसण्याची शक्यतासुद्धा वर्तवली जात आहे. सध्याच्या घडीला ही शक्यता महायुतीसंदर्भात व्यक्ती केली जात असून, त्यांचा एक सोबती आता तिसऱ्या आघाडीच्या निर्मितीसाठी प्रयत्नशील असल्याचं पाहायला मिळतंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकृत सूत्रांच्या माहिचीनुसार राज्यात महायुतीला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. कारण, बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडून तिसरी आघाडी स्थापन करण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. शुक्रवार (9 ऑगस्ट 2024) बच्चू कडूंचा संभाजीनगरात मोर्चा आहे. याचवेळी बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडण्याची घोषणा करण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. त्यामुळे आमदार बच्चू कडू यांच्या निर्णयाकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. 


इथं प्रचाराचं रणशिंग, तिथं युतीला गळती... 


विधानसभेसाठीची मोर्चेबांधणी सुरू झालेली असतानाच महायुतीने निवडणुकीसाठीच्या प्रचाराचं रणशिंग फुंगल्याचं पाहायला मिळतंय. गुरुवारी रात्री तब्बल दोन तास वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्यामध्ये सदरील मुद्द्यावर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या निवासस्थानी पार पडलेल्या या बैठकीत 20 ऑगस्टपासून राज्यात महायुतीचे मेळावे सुरु होणार असल्याचा निर्णय घेण्यात आला. 


हेसुद्धा वाचा : बच्चू कडू संतापले, अधिकाऱ्याच्या लगावली कानशिलात


 


थोडक्यात महायुतीने विधानसभेच्या प्रचाराचं रणशिंग फुंकलं असून महायुतीचे नेते एकत्र प्रचार करणार आहेत हे आता स्पष्ट होत आहे. सात विभागांत  महायुतीच्या मोठ्या सभा होणार आहेत. ज्यामध्ये मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री सभांना संबोधित करताना दिसतील. 


पश्चिम महाराष्ट्रात गद्दारीचा वचपा काढणार महायुती?


गुरुवारी पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदार आणि नेत्यांची उपमुख्यमंत्र्यांच्या सागर या सरकारी बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीत देवेंद्र फडणवीसांनी  पश्चिम महाराष्ट्रातील भाजप आमदारांना विधानसभेचा कानमंत्र दिला. पश्चिम महाराष्ट्रात लोकसभेला झालेल्या गद्दारीला कामातून धडा शिकवा असा सल्ला दिला. लोकसभेत ज्या ज्या मुद्यांवर फटका बसला त्याचा आढावा घेतला. तसंच मराठा, ओबीसी आरक्षण, शेतमालाचा भाव यावरीही फडणवीसांना आमदारांसोबत चर्चा केली.