मुंबई : महाविकासआघाडीमधील मंत्री आणि शिवसेनेचे मोठे नेते एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. एकनाथ शिंदे यांनी बंड केल्याने ठाकरे सरकार संकटात सापडलं आहे. आता उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कॅबिनेटच्या बैठकीत याबाबत निर्णय होऊ शकतो.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांनी ही शिवसेनेला घराचा आहेर दिला आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीवर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, 'मी सुरूवातीपासून उद्धव साहेबांना सांगतोय की आपण भाजपसोबत जायला हवं. एकनाथ शिंदे गेल्यापासूनही त्यांची भूमिका मी सीएम साहेबांना सांगतोय.'


'शिवसैनिकांकडून माझी गाडी अडवणे, माझ्यावर पाळत ठेवणे. असले प्रकार अजिबात सहन करणार नाही. माझ्या घरासमोर माणसं ठेवू नका म्हणून सांगितलेले असतानाही माणसे ठेवली गेली. ही दादागिरी मी सहन करणार नाही. लोकप्रतिनिधींना सन्मान दिला पाहिजे. असं ही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे.


दीपक केसरकर हे काल घरी जात असताना त्यांना शिवसैनिकांनी रोखलं होतं. त्यामुळे ते चांगलेच संतप्त झाले होते.