उल्हासनगर : भाजपचे तिकीट मिळणार या आशेवर असलेल्या ज्योती कलानी यांनी राष्ट्रवादीचा राजीनामा दिला होता. कलानी कुटुंबाला, भाजपने ऐनवेळी तिकीट नाकारल्याने ज्योती कलानी यांच्यावर पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडूनच तिकिट मिळवण्याची नामुष्की ओढावली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आम्हाला आश्वासन देऊनही ऐनवेळी दगा दिला. त्यामुळे पुन्हा आपल्या पक्षाकडे वळावे लागले असा धक्कादायक खुलासा विद्यमान आमदार आणि उल्हासनगर मतदार संघाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती कलानी यांनी केला आहे.


सिंधी मतदारांची संख्या अधिक


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उल्हासनगर मतदारसंघात भाजपकडून माजी आमदार कुमार आयलानी रिंगणात आहेत. उल्हासनगरमध्ये सिंधी मतदारांची संख्या अधिक आहे. त्यामुळ या समाजाचे मतदार कोणाच्या पारड्यात मत टाकता यावर उल्हासनगरचा आमदार ठरत असतो. पप्पु कलानी यांचा मुलगा ओमी कलानी देखील भाजपकडून उमेदवारीसाठी इच्छूक होते. पण त्यांना भाजपने तिकीट नाकारलं.


१८ उमेदवार रिंगणात


उल्हासनगर मतदारसंघ राष्ट्रवादीचा बालेकिल्ला समजला जातो. कलानी कुटुंबामुळे येथे राष्ट्रवादीची ताकद वाढली होती. विद्यमान आमदार ज्योती पप्पू कलानी यांचे पुत्र ओमी कलानी यांनी लोकसभेला भाजपला समर्थन दिल्यानंतर या मतदारसंघात युतीची ताकद वाढली होती. २०१४ च्या निवडणुकीत मोदी लाटेतही भाजपचे उमेदवार कुमार आयलानी यांचा पराभव झाला होता. उल्हासनगर मतदारसंघातून एकूण १८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.


खाली पाहा संपूर्ण यादी