किरण ताजणे, झी मीडिया, पुणे : कोरोनाच्या काळात आपल्या जवळच्या लोकांना भेटणंही टाळलं जात आहे. रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या नात्यातील महत्वाचा सण. या दिवशी बहिण आपल्या भावाला रक्षण करण्यासाठी राखी बांधते. पण सध्या कोरोनासारख्या महामारीमुळे कोरोना यौद्धाच आपले रक्षणकर्ते झाले आहेत. अशावेळी आमदार रोहित पवार यांनी या कोरोना यौद्धांसोबत रक्षाबंधन साजरे केले आहेत.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


आमदार रोहित पवार यांचे ससून येथील महिला कर्मचाऱ्यांसोबत रक्षाबंधन साजरे केले.  कोरोना वॉरियर्ससोबत रक्षाबंधन साजरा केल्यानं महिला कर्मचारी देखील यावेळी भावूक झाल्या. ससून येथील महिला कर्मचाऱ्यांनी आमदार रोहित पवार यांना राखी बांधत औक्षण
 केलं. 



यावेळी सॅनिटायझर, मास्कची रोहित पवारांकडून ओवाळनी देखील कोरोना यौद्धांना देण्यात आली. कोरोना वॉरियर्सचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करेन असा देखील शब्द यावेळी रोहित पवार यांनी दिला. या वेळी ससून मधील कर्मचाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्याची महिला कर्मचाऱ्यांची रोहित पवार यांच्याकडे मागणी केली.