MLC Election Results 2023 Updates : मराठवाडा शिक्षक मतदार संघातील निवडणुकीत महाविकास आघाडीचे  ( Mahavikas Aghadi) उमेदवार विक्रम काळे ( Vikram Kale ) यांनी मोठी आघाडी घेतली आहे. (Maharashtra Political News) त्यामुळे त्यांचा विजय निश्चित असल्याचे बोलले जात आहे. 6 हजार मतांची त्यांनी आघाडी घेतली आहे. विक्रम काळे यांना पहिल्या पसंतीची 18 हजार मते मिळाली आहेत. तर किरण पाटील यांना 12 हजार आणि सूर्यकांत विश्वासराव यांना 11 हजार मते मिळाली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

Maharashtra MLC Election Results 2023 LIVE :  पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक निकाल अपडेट पाहा


मराठवाडा शिक्षक मतदार संघात निवडणूक मतमोजणीस सकाळी 8 वाजता सुरुवात झाली. सुरुवातीला मतपेट्या उघडून मतपत्रिका एकत्रित करण्यात आल्या. त्यानंतर मतांचे 25-25 चे गठ्ठे करुन मोजणीसाठी 56 टेबलवर प्रत्येकी 40 गठ्ठे देण्यात आले. दुपारी 12 वाजेपर्यंत वैध-अवैध मतांचे वर्गीकरण करण्यात आले.  या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार आणि विद्यमान आमदार विक्रम काळे हे आघाडीवर आहेत, तर दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष असलेले, शिक्षक आघाडीचे सूर्यकांत विश्वासराव आहेत.  तर भाजपचे उमेदवार किरण पाटील तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले आहेत. त्यामुळे अपक्ष आणि महाविकास आघाडीत जोरदार चुरस पाहायला मिळत आहे.


MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी


सकाळी मतमोजणीला सुरुवात झाली तेव्हा एका मतपत्रिकेवर संशयास्पद खूण आढळून आली. यावरुन भाजप उमेदवार किरण पाटील यांचे प्रतिनिधी शिवाजी दांडगे आणि मतमोजणी अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला. त्यामुळे मतमोजणीस्थळी काही वेळ तणावाची स्थिती निर्माण झाली. या मतपत्रिकेवर पहिल्या पसंतीचे मत विक्रम काळे यांना तर दुसर्‍या पसंतीचे मत किरण पाटील यांना नोंदवलेले होते. अखेर निवडणूक अधिकारी तथा विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या मध्यस्थीने वाद मिटला.  



कोकण मतदार संघात महाविकास आघाडीला धक्का


कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) विजयी झालेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपने म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिला विजय मिळाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ 9 हजार 500 मते पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.