MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी

MLC Election Results 2023 Updates : कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी झालेत.  पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. 

Updated: Feb 2, 2023, 01:11 PM IST
MLC Elections Results : कोकण मतदारसंघातून भाजपचे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी title=
MLC Election Results 2023 । Dnyaneshwar Mhatre won from Konkan

Maharashtra Legislative Council Election Result 2023 :  कोकण शिक्षक मतदारसंघात भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे (Dnyaneshwar Mhatre) विजयी झालेत. म्हात्रे यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. पहिल्याच फेरीत भाजपचे उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी निर्णायक आघाडी घेतली होती. दरम्यान, आम्ही बाळाराम पाटील यांच्यासाठी प्रयत्न करत होतो. मात्र, असा काही निकाल लागला असेल तर तो धक्का आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

Maharashtra MLC Election Results 2023 LIVE अपडेट पाहा

विधानपरिषद निवडणुकीत भाजपने म्हात्रे यांच्या माध्यमातून पहिला विजय मिळाला आहे. त्यांनी शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव केला आहे. ज्ञानेश्वर म्हात्रे यांना 20 हजारपेक्षा जास्त मत पडली असून शेकापच्या बाळाराम पाटील यांना केवळ 9 हजार 500 मते पडली आहेत. हा महाविकास आघाडीसाठी हा मोठा धक्का आहे.

 ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी या विजयानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे, हा विजय माझा एकट्याचा नसून मतदारसंघातील संपूर्ण शिक्षकांचा आहे. गेल्या सहा वर्षात मी जे काम केले, त्याची ही पोचपावती आहे. कोकण विभागातील शिक्षकांनी मला चांगला पाठिंबा दिला आहे. तब्बल 33 संघटनाचा आम्हाला पाठिंबा होता. तसेच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी माझावर जो विश्वास टाकला, तो विश्वास आज सार्थकी लागला आहे.

महाराष्ट्र विधान परिषदेच्या  पाच जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी गुरुवारी सकाळी 8 वाजता सुरु झाली. शिक्षक मतदारसंघातील तीन आणि पदवीधर मतदारसंघातील दोन अशा पाच परिषद सदस्यांचा सहा वर्षांचा कार्यकाळ 7 फेब्रुवारी रोजी संपत आहे आणि आगामी रिक्त पदे भरण्यासाठी सोमवारी मतदान घेण्यात आले. कोकण शिक्षक मतदारसंघात सर्वाधिक 91.02 टक्के मतदान झाले, तर नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघात सर्वात कमी  49.28 टक्के मतदान झाले. औरंगाबाद आणि नागपूर या शिक्षक मतदारसंघात अनुक्रमे 86 टक्के आणि 86.23 टक्के मतदान झाले, तर अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघात 49.67टक्के मतदान झाले.