Maharashtra MLC Election Results 2023 LIVE : अमरावतीत भाजपला मोठा झटका, महाविकास आघाडीचा विजय

MLC Election Results 2023 Updates : Amravati MLC Results : अमरावती पदवीधर मतदारसंघाची मतमोजणी अजून सुरुच आहे.  (Amravati Graduate Constituency) दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi)  तर अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी 26 तासापासून सुरुच आहे.

Maharashtra MLC Election Results 2023 LIVE :  अमरावतीत भाजपला मोठा झटका, महाविकास आघाडीचा विजय

Maharashtra MLC Election Results 2023 Updates : औरंगाबाद, नागपूर, कोकण शिक्षक मतदारसंघ आणि नाशिक तसंच अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी (Maharashtra Teachers and Graduate Election Result)  मतमोजणी पार पडली. विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीने बाजी मारल्याचे दिसून येत आहे. या निवडणुकीत आम्हीच चमत्कार करणार असा दावा भाजप-शिंदे गटाने केला होता. मात्र, त्यांना केवळ दोनच जागांवर समाधान मानावे लागले आहे. 5 पैकी 4 जागांचे निकाल जाहीर झालेत. यात महाविकास आघाडी 2, भाजप 1, अपक्ष 1 जागी विजयी झाले आहेत. तर अमरावतीची मतमोजणी 23 तासांपासून सुरु असून येथे महाविकास आघाडीचा उमेदवार आघाडीवर आहे. त्यामुळे आघाडीच्या खात्यात आणखी एक जागा जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व राहिल्याचे दिसून येत आहे.

3 Feb 2023, 14:10 वाजता

अमरावती विभागात भाजपला मोठा झटका, महाविकास आघाडीचा विजय

Maharashtra MLC Election Results 2023 Updates :  अखेर 32 तासांच्या मतमोजणीनंतर महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे विजयी. भाजप उमेदवार रणजित पाटील यांचा दारुण पराभव अमरावती विभागात भाजपला मोठा झटका. अजून अधिकृत घोषणा नाही

3 Feb 2023, 12:25 वाजता

आतापर्यंत 19 उमेदवार बाद, अजूनही कोटा पूर्ण नाही!
Maharashtra MLC Election Results 2023 Updates :  अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीतून उमेदवार अरुण सरनाईक बाद झालेत. आतापर्यंत 19 उमेदवार बाद.  धीरज लिंगाडे यांना 44 हजार 448 तर डॉ. रणजीत पाटील यांना 41 हजार 896 मते. अजूनही कोटा (47 हजार 101 मते ) पूर्ण नसल्याने सद्य:स्थितीत सर्वात कमी मते असलेल्या उमेदवाराची (डॉ. प्रवीण चौधरी, 1 हजार 774 मते ) दुसऱ्या पसंतीची मत गणना सुरु आहे.

3 Feb 2023, 10:42 वाजता

Maharashtra MLC Election Results 2023 Updates :  अमरावती पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची मतमोजणी  मागील 26 तासापासून  सुरुच आहे. महाविकास आघाडीचे  धिरज लिंगाडे आतापर्यंत 2366 मतांनी आघाडीवर आहेत. तर भाजपचे उमेदवार रणजित पाटील पिछाडीवर आहे. धिरज लिंगाडे यांची विजयाकडे घौडदौड सुरु आहे. धीरज लिंगाडे यांना आतापर्यंत 43632 मतं मिळाली आहेत. रणजीत पाटील यांना आतापर्यंत 41260 मते. तर सध्या पसंती क्रमांक दोनच्या मतांची मोजणी सुरु आहे. विजयासाठी  47101 मतांची गरज आहे. धिरज लिगांडे 2372 मतांनी आघाडीवर आहेत. दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीत आतापर्यंत 12 उमेदवार बाद

3 Feb 2023, 08:09 वाजता

अमरावतीत घमासान, भाजप - काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची

MLC Election Results : अमरावती पदवीधर निवडणूक मतमोजणी सुरुच आहे. विजयी उमेदवारासाठी मताचा कोटा जाहीर झाला आहे. निवडून येण्यासाठी 46927 मतांचा कोटा जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान मतमोजणी केंद्राबाहेर भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांची जोरदार बाचाबाची झाली. जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. (Maharashtra Political News in Marathi) काल मध्यरात्री दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यासमोर जुन्या पेन्शनच्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आल्या. पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप उमेदवार रणजीत पाटील मतमोजणी केंद्राबाहेर निघून गेले.  (Maharashtra News in Marathi)

3 Feb 2023, 08:07 वाजता

अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची शक्यता

MLC Election Results : अमरावतीत भाजपला धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. (Amravati Graduate Constituency) महाविकास आघाडीचे धीरज लिंगाडे आघाडीवर आहेत. गेल्या 23 तासांपासून अमरावती पदवीधर मतदारसंघात मतमोजणी सुरुच आहे. (Maharashtra Political News in Marathi) सकाळी 10 वाजेपर्यंत निकाल हाती येण्याची शक्यता आहे. (Amravati Graduate Election Result ) दुसऱ्या पसंतीची मतं मोजण्यास सुरुवात झाली आहे. विजयाचा कोटा पूर्ण कऱण्यासाठी 47 हजार 101 मतांची गरज आहे.(Maharashtra News in Marathi)

2 Feb 2023, 20:50 वाजता

नाशिक पदवीधर मतमोजणी

तिसरी फेरी एकूण मते 84000
तिसऱ्या फेरीअखेर मिळालेली एकुण मते
वैध मते - 75622
सत्यजित तांबे - 45607
शुभांगी पाटील - 24927
अवैध मते - 8378

2 Feb 2023, 19:39 वाजता

नाशिक पदवीधर मतमोजणी, दुसऱ्या फेरी अखेर सत्यजीत तांबे आघाडीवर
सत्यजित तांबे यांना 31009 मतं
शुभांगी पाटील यांना 16316 मतं
तांबे 14793 मतांनी आघाडीवर

2 Feb 2023, 18:15 वाजता

नागपूर विभागात शिक्षक मतदार संघात मविआचे सुधाकर अडवाले यांना विजयी घोषित करण्यात आलं आहे. एकूण 34 हजार 360 मतांपैकी 1409 मत अवैध ठरली. सुधाकर अडबाले यांना 16, 700 मतं मिळाली, तर भाजपचे नागो गाणार यांना 8211 मतं मिळाली. कोटा 16477 मतांचा असताना सुधाकर अडबाले यांना 16700 मते मिळाली.. म्हणून ते पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये विजयी झाले...

2 Feb 2023, 17:51 वाजता

MLC Election Results 2023 Updates: नाशिक पदवीधर मतदारसंघातील मतमोजणीच्या पहिल्या फेरीतील आकडेवारी समोर आली आहे. सत्यजित तांबे यांना 15 हजार 784 मतं मिळाली आहेत. तर शिवसेनेनं पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील यांना पहिल्या फेरीत 7 हजार 862 मतं मिळाली आहेत.

2 Feb 2023, 17:36 वाजता

MLC Election Results 2023 Updates: औरंगाबाद शिक्षक मतदारसंघामध्ये विक्रम काळेच्या कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला आहे.  विक्रम काळे मतमोजणी केंद्र बाहेर आले त्यावेळेस कार्यकर्त्यांनी त्यांना उचलून घेतलं आणि विजयाच्या जोरदार घोषणा दिल्या.. यावेळी कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त करताना, 'एकच पसंत विक्रम वसंत' या घोषणा दिल्या.