ठाणे : रेल्वे स्टेशन परिसरातील फेरीवाल्यांना आज सकाळी मनसे कार्यकर्त्यांनी चांगलाच चोप दिला. त्याचवेळी मांडलेल्या स्टॉल्सची तोडफोड करण्यात आली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम रेल्वे मार्गावरील एल्फिन्स्टन स्थानकावरील चेंगराचेंगरीनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रेल्वे प्रशासनाला १५ दिवसांची डेडलाईन दिली होती. ती आज संपली आणि मनसे कार्यकर्ते येथे आक्रमक झालेत. ठाणे स्टेशनबाहेर राडा पाहायला मिळाला. मनसेने फेरीवाल्यांना चांगलेच चोपल्याची चर्चा होती.


राज ठाकरे यांच्या इशाऱ्यानंतर रेल्वे प्रशासन जागे झाले आणि  अनेक स्टेशनवर बसणाऱ्या फेरीवाल्यांना हटविले तर काही ठिकाणी फेरीवाला मुक्त परिसर केला. मात्र, ठाणे रेल्वे स्थानक परिसरात फेरीवाल्या दिसताच आज मनसे कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेत. त्यानंतर ठाणे स्टेशनबाहेरील फेरीवाल्यांवर मनसे स्टाईल चोप देण्यात आला.


मनसे कार्यकर्त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील फेरीवाल्यांच्या स्टॉल्सची तोडफोड केली आहे.  रेल्वे प्रशासनाला फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासंदर्भात दिलेली १५ दिवसांची डेडलाईन राज यांनी दिली होती. ती आज संपताच मनसे आक्रमक झाली आहे.