मुंबई : परप्रांतीय ओबीसींना राज्यात आरक्षण देण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक असल्याची बातमी समोर आली होती. यावरुन आता मनसे आक्रमक झाली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी यावर ट्विट करुन जोरदार टीका केली आहे.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'परप्रांतातून राज्यात स्थायिक झालेले अनेक ओबीसी कुटुंब आहेत. परप्रांतीय ओबीसी समाजाने माझी भेट घेऊन राज्यात आरक्षण देण्याची मागणी केली आहे. १९६७ पूर्वी जी कुटुंब परप्रांतातून महाराष्ट्रात आली आहेत त्यांना राज्यात आरक्षण देण्याविषयी आम्ही सकारात्मक आहोत. मागासवर्ग आयोगाला याबाबत शिफारस करू त्यांचा प्रस्ताव आला की केंद्र सरकारला शिफारस केली जाईल.' असं विजय वड्डेटीवार यांनी म्हटलं आहे.


राज्यात आधीच आरक्षणाचे विविध प्रश्न प्रलंबित असताना आता त्यात उत्तर भारतीय लोकांना आरक्षण देण्याबाबतच्या विधानावर राज्यात पुन्हा एकदा नवा वाद तयार होण्याची शक्यता आहे. मनसेने यावर सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मनसे विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळू शकतो.


परप्रांतीयांना आधीच विरोध करणाऱ्या मनसेकडून आता परप्रांतीयांना आरक्षण देण्याबाबतच्या मुद्द्यावर आणखी आक्रमक होण्याची चिन्ह आहेत.