Raj Thacekray MNS News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. (Maharashtra Political News) राज यांच्या दौऱ्याची मनसेकडून घोषणा करण्यात आली आहे. राज ठाकरे 1 ते 9 डिसेंबरदरम्यान कोकण दौऱ्यावर जाणार आहेत. (Raj Thacekray's Konkan Tour)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज ठाकरे (Raj Thackeray) हे आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या बांधणीवर जोर देत आहेत. आता राज ठाकरे हे कोकणातील जिल्ह्यांतील पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेणार आहे. कोकण दौऱ्याची (Konkan Tour) सुरुवात ही डिसेंबपासून होणार आहे. (Maharashtra Political News Update) तसेच  राज ठाकरे राज्याच्या विविध भागांचा दौरा करणार आहेत. त्याची सुरूवात त्यांनी विदर्भ दौऱ्यापासून केली होती. आता राज ठाकरे विदर्भानंतर कोकण दौऱ्यावर जात आहेत. या दौऱ्यात रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन, पक्षसंघटन बळकट करणं यावर राज ठाकरे लक्ष केंद्रीत करणार आहेत. (अधिक वाचा - जितेंद्र आव्हाड देणार आमदारकीचा राजीनामा)


मुंबई पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक



मनसे प्रमुख राज ठाकरे कोकण दौरा जाहीर करण्यात आला असताना राज ठाकरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. मुंबईतील  वांद्र्यातील एमआयजी क्लबमध्ये ही बैठक आज होणार आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठक होत आहे. यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे संवाद साधणार आहेत.  मुंबईतील लोकसभानिहाय परिस्थितीचा घेणार आढावा आहेत. तसेच मनसे गटनेता मेळाव्याच्या तयारीचाही आढावा यावेळी ते घेणार आहेत.